Xiaomi Redmi S2 ची किंमत लॉन्च च्या आधी लीक, या किंमतीवर केला जाऊ शकतो सादर
Xiaomi Redmi S2 कंपनी कडून एक बजेट स्मार्टफोन च्या रुपात लॉन्च केला जाऊ शकतो, हा डिवाइस 10 मे ला लॉन्च केला जाईल.
Xiaomi Redmi S2 कंपनी कडून एक बजेट स्मार्टफोन च्या रुपात लॉन्च केला जाऊ शकतो, हा डिवाइस 10 मे ला लॉन्च केला जाईल. या डिवाइस चा कंपनी कडून एक पोस्टर पण समोर आला आहे. हा पोस्टर पण लॉन्च जवळ असताना समोर आला आहे. मागच्याच आठवड्यात समजले होते की हा डिवाइस iPhone X सारख्या ड्यूल कॅमेरा सेटअप आणि बेंट एंटेना लाइन्स सह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच याचे स्पेक्स पण समोर आले आहेत.
Xiaomi Redmi S2 एक लोअर मिड-रेंज मॉडेल असू शकतो ज्याची डिजाइन मोठया प्रमाणात काही दिवसांपूर्वी चीन मध्ये लॉन्च झालेल्या Mi 6X प्रमाणे आहे. असे वाटत आहे की कंपनी आपल्या Mi 6X मॉडल मध्ये AI फीचर्स सामील करेल. आर्टिफिशियल इंटेलिजेंस वर आधारित पोर्ट्रेट मोड फ्रंट कॅमेरा च्या फेशियल रिकोग्निशनला वाढवेल जेणेकरून हा अजून एक्यूरेट बनेल. हा कॅमेरा AI ब्यूटी सह येतो जो एक फीमेल फेस ओळखून मेकअप करतो आणि लिप मेकअप आणि आई डिटेल्स कलर्स सुरक्षित ठेऊन चेहरा ब्यूटीफाय करतो.
या स्मार्टफोन मध्ये 5.99 इंचाचा डिस्प्ले असू शकतो ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 असेल. डिस्प्ले चे रेजोल्यूशन HD+ (1440 x 720 पिक्सल) असेल. फोटो पाहून असे वाटते की डिवाइस मध्ये 3.5mm ऑडियो जॅक नाही. डिवाइस च्या बॅक वर U शेप्ड ऐन्टेना डिजाइन आणि वर्टिकल डुअल कॅमेरा सेटअप दिसत आहे. डिवाइस च्या बॅक वर रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर पण आहे.
हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 ओक्टा-कोर SoC द्वारा संचालित असेल आणि यात 2GB आणि 16GB स्टोरेज असेल तसेच याची स्टोरेज माइक्रो SD कार्ड ने वाढवता येते. तसेच डिवाइस 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट तसेच 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला जाईल.
कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलले जात आहे की या डिवाइस मध्ये 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. कॅमेरा सेटअप मधून तुम्ही DSLR प्रमाणे बोकेह इफेक्ट्स वाले फोटो घेऊ शकाल. स्मार्टफोन च्या फ्रंट वर 16 मेगापिक्सल चा कॅमेरा दिला जाईल तसेच हा डिवाइस 3000mAh च्या बॅटरी सह येईल. सॉफ्टवेर बद्दल बोलायचे तर हा डिवाइस MIUI 9.5 इंटरफेस सह एंड्राइड ओरियो वर चालेल.
जर मायड्राइवर्स चा एक रिपोर्ट पाहिला तर असे समोर येत आहे की हा डिवाइस CNY 1,000 म्हणजे जवळपास Rs 10,600 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, पण याच्या वेगवेगळ्या रॅम वेरिएंट्स ची किंमत अजून समोर आली नाही.