मोबाईल निर्माता कंपनी शाओमी ने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला शाओमी रेडमी प्रो स्मार्टफोन अखेर लाँच केला. सध्यातरी हा स्मार्टफोन केवळ चीनमध्ये उपलब्ध झाला आहे. मात्र लवकरच ह्याला अन्य देशांमध्ये लाँच केले जाईल, असे सांगितले जातय. हा स्मार्टफोन दोन प्रकारात उपलब्ध आहे, 3GB रॅम आणि 4GB रॅम. ज्याच्या 3GB वेरियंटची किंमत 1499 युआन (जवळपास १५,००० रुपये) आणि 4GB वेरियंटची किंमत 1999 युआन (जवळपास २०,०००) इतकी आहे.
जर शाओमी रेडमी प्रो च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची OLED डिस्प्ले दिली गेली आहे. ह्याचा 3GB चा वेरियंट हेलिओ X10 SoC वर चालतो, तर दुसरीकडे 4GB वेरियंट हेलिओ X26 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्याच्या 3GB रॅम प्रकारात 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, तर 4GB रॅम प्रकारात 128GB चे स्टोरेज दिले आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स 4G LTE सपोर्टसह येतात.
ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ह्या दोन सेंसरद्वारा फोटो काढताना फोटोचे डेप्थ ऑफ फिड ऑटोमेटिकली अॅडजस्ट होते.
हेदेखील वाचा – ह्या १० आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळतेय सर्वात मोठी बंपर सूट…
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE, VoLTE सपोर्ट, ब्लूटुथ, GPS, वायफाय सपोर्ट दिले आहे. तसेच ह्यात USB टाइप – C पोर्टसुद्धा दिला आहे. त्याचबरोबर ह्यात 4050mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
हेदेखील वाचा – पुढील ३ महिन्यात सुरु होणार रिलायन्स जिओ 4G सेवा: CLSA
हेदेखील वाचा – जगातील पहिला लिक्विड कूल्ड लॅपटॉप आसूस ROG GX700 भारतात लाँच