विशेष म्हणजे ऑगस्ट 2018 मध्ये Xiaomi Redmi Note 6 Pro चा वेरिएंट Snapdragon 660 SoC प्रोसेसर सह चायनीज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर दिसला होता. Weibo च्या पोस्ट नुसार हा नवीन वेरिएंट भारतात लॉन्च केला जाणार होता. त्यानंतर पुन्हा एकदा नुकताच शाओमीच्या या नवीन वेरिएंटचा खुलासा झाला आहे. लॉन्च बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन लॉन्चच्या वेळी Snapdragon 636 प्रोसेसर सह लॉन्च केला गेला होता. शाओमीचा हा नवीन वेरिएंट फ्लिपकार्ट वर एका सेल मध्ये लिस्ट केला गेला आहे.
फ्लिपकार्ट वर लिस्ट केलेली carousel इमेज आता काढून टाकण्यात आली आहे. त्याचबरोबर Snapdragon 636 चिपसेट वेरिएंट सेल अंतर्गत लिस्ट केला गेला आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून तो काढून टाकण्याआधीच टिपस्टर Ishan Agarwal ने त्याचा खुलासा करत Twitter वर तो पोस्ट केला. Snapdragon 660 SoC वेरिएंट सह Xiaomi Redmi Note 6 Pro 5,000mAh बॅटरी सोबत पण स्पॉट केला गेला आहे. याआधीच्या लॉन्च मध्ये हा डिवाइस 4,000mAh बॅटरी सह उपलब्ध करवण्यात आला होता.
यावर Flipkart ने पण आपली सफाई दिली आहे. फ्लिपकार्ट चे म्हणणे आहे कि असे त्यांच्या डिजाइन टीम च्या चुकीमुळे झाले आहे ज्यांनी फोन्सचे स्पेक्स मिक्स केले होते. कंपनीच्याच एका सूत्राने 'Digit' कडे याचा खुलासा करत सांगितले कि त्यांच्या पाइपलाइन मध्ये अशाप्रकारचे कोणतेही प्रोडक्ट नाही. त्याचबरोबर डिजिट टीम अधिकृत विधानासाठी Flipkart प्रवक्त्यांकडे पण चोकशी केली.
विशेष म्हणजे हि बातमी Qualcomm Snapdragon 660 असलेला Xiaomi Redmi Note 5 आणि Xiaomi Redmi Note 5 Pro Geekbench वर स्पॉट केल्यानंतर दोन दिवसांनी आली होती. दोन्ही फोन्स Android Pie 9.0 वर चालत आहेत. Redmi Note 5 Snapdragon 625 सह आणि Pro वेरिएंट Snapdragon 636 प्रोसेसर सह येतात. हे फोन्स Android 7.1.2 Nougat आऊट ऑफ द बॉक्स सह लॉन्च केले गेले होते जे नंतर Android Oreo वर अपग्रेड केले गेले होते.
या स्मार्टफोनचे स्पेक्स पाहता शाओमी रेडमी नोट 6 प्रो 6.26-इंचाच्या HD+ डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे. हा 19:9 आस्पेक्ट रेश्यो सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट सह येतो. सोबतच हा MIUI 10 वर आधारित आहे. फोन एंड्राइड 8.1 Oreo वर चालतो. फोन मध्ये तुम्हाला एक 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी क्विक चार्ज 3.0 सपोर्ट सह मिळत आहे. Redmi Note 6 Pro 4GB/6GB रॅम सह 64GB स्टोरेज सह लॉन्च केला गेला आहे. तुम्ही हि 256GB पर्यंत माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. यासोबतच फोन मध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅनर सह फेस अनलॉक फीचर पण मिळत आहे.
ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर फोन मध्ये तुम्हाला ड्यूल रियर आणि ड्यूल फ्रंट कॅमेरा मिळत आहे. या मोबाइल फोन मध्ये तुम्हाला एक 12MP+5MP चा वर्टीकल ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळत आहे. तसेच फोन मध्ये तुम्हाला 20MP+2MP चा फ्रंट कॅमेरा सेटअप मिळत आहे, फोन मध्ये तुम्हाला नॉच पण मिळत आहे.