शाओमी रेडमी नोट 5 14 फेब्रुवारीला भारतात लाँच होणार आहे. हा कंपनीचा भारतात यावर्षी लाँच होणारा पहिला फोन असेल. तसे शाओमी रेडमी नोट 5 चे आता पर्यंत भरपूर लीक समोर आले आहेत, पण आता या फोनचा एक नवीन रेंडर समोर आला आहे. ज्याला बघुन वाटतय की, हा रेडमी 5 प्लस पेक्षा खूप वेगळा असेल. एक बातमी अशी पण होती कि, शाओमी रेडमी 5 प्लस ला भारतात शाओमी रेडमी नोट 5 च्या नावाने लाँच करेल.
या नव्या रेंडर ला बघितल्या नंतर अस वाटतय की, हा फोन 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह येईल. याचे वरच्या तसेच खालच्या बाजूचे किनारे खूप छोटे असतिल.
या फोन च्या मागच्या बाजूस डुअल रियर कॅमरा सेटअप असेल. ज्याच्या ठीक खाली एलईडी फ्लॅश आणि फिंगरप्रिंट सेंसर पण असेल. या फोनच्या ऐन्टेना लाइन्स पण स्पष्ट दिसत आहेत.
अशा आहे की, शाओमी रेडमी नोट 5 मध्ये फुल एचडी प्लस रेजोल्यूशन वाला 5.99-इंचाचा डिस्प्ले असेल. सोबतच हा फोन स्नॅपड्रॅगन 636 किंवा 630 प्रोसेसर वर चालेल. फोन मध्ये 4जीबी रॅम सह 32जीबी आणि 64 जीबी स्टोरेज चे ऑप्शन मिळतील. ह्या फोन मध्ये 4100एमएएच ची बॅटरी असू शकते.