बोलायाचे झाले Xiaomi बद्दल तर ही कंपनी बजेट आणि मिड-रेंज सेगमेंट मध्ये सर्वात पुढे आहे. असे पण बोलू शकतो की हा सेगमेंट Xiaomi द्वारा लीड केला जात आहे. त्याचबरोबर इतर कंपन्या पण या सेगमेंट मध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा विचार करत आहेत. दुसरी चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Lenovo ने या सेगमेंट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन काल लॉन्च करून एक नवीन कीर्तिमान मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. हा डिवाइस Lenovo Z5 नावाने लॉन्च करण्यात आला आहे, पण हा स्मार्टफोन अजून भारतात लॉन्च करण्यात आला नाही, परंतु आज आम्ही भारतातील एक सर्वात दमदार स्मार्टफोन Xiaomi Redmi Note 5 Pro सोबत याच्या स्पेक्स ची तुलना करून बघितली आहे की हा स्मार्टफोन Xiaomi च्या या दमदार स्मार्टफोन ला टक्कर देत आहे की नाही ते. चला तर बघुया या दोन्ही स्मार्टफोंस चे स्पेक्स पाहता या दोन्ही मध्ये कोणता फरक दिसून येते.
डिजाईन
या दोन्ही स्मार्टफोंस मधील तुलनेची सुरवात यांच्या डिजाईन पासून करत आहोत. आता जर डिजाईन पासून सुरवात केली आहे तर तुम्हाला सांगतो की Lenovo Z5 स्मार्टफोन आकर्षक डिजाईन सह लॉन्च करण्यात आला आहे या डिवाइस मध्ये एक ग्लास बॅकप्लेट आहे, जो कंपनी कडून आॅरोरा ग्रेडिएंट आणि मेटल फ्रेम सह येतो. याचा डिस्प्ले फोन ची फ्रंट पूर्णपणे कॅप्चर करतो, पण एक नॉच इथे ठेवण्यात आली आहे. तसेच Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन एका स्टॅण्डर्ड 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. यात एक फुल मेटल यूनीबॉडी डिजाईन आहे. दोघांची डिजाईन पाहता Lenovo Z5 स्मार्टफोन जास्त आधुनिक वाटतो. कारण Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन ची डिजाईन त्यांच्या जुन्या स्मार्टफोंस शी मिळती जुळती आहे.
डिस्प्ले
जर तुम्हाला iPhone X स्मार्टफोन आवडत असेल तर तुम्हाला Lenovo Z5 स्मार्टफोन पण खुप आवडेल, कारण या दोघांमध्ये कोणती इतर समानता असो वा नसो, एक बाब मात्र सारखी आहे, ती आहे दोघांचेही नॉच डिजाईन सह लॉन्च होणे. याव्यतिरिक्त हा डिवाइस एका 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. पण दोन्ही स्मार्टफोंस ची व्युविंग क्वालिटी कागदावर एक सारखी वाटते. परंतु Lenovo Z5 स्मार्टफोन मध्ये तुम्हाला हायर ब्राइटनेस मिळत आहे, जी 700 nits आहे, याचा अर्थ असा की तुम्हाला Lenovo Z5 स्मार्टफोन वर सूर्यप्रकाशात जास्त चांगली विजिबिलिटी मिळेल. याच्या तुलनेत जर Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर यात 450 nits देण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की डिस्प्ले च्या बाबतीत पण हा स्मार्टफोन म्हणजे Lenovo Z5 पुढे आहे.
हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर
एकीकडे Xiaomi Redmi Note 5 Pro मध्ये 6GB चा रॅम देण्यात आला आहे, पहिल्यांदाच शाओमी ने आपल्या मिड-रेंज स्मार्टफोन मध्ये 6GB चा रॅम दिला आहे. भारतीय बाजारात भरपूर कमी स्मार्टफोंस आहेत ज्यात इतक्या कमी किंमतीत 6GB चा रॅम मिळत आहे. Xiaomi Redmi Note 5 Pro मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो कोणत्याही फोन मध्ये पहिल्यांदा वापरला जात आहे. तर दुसरीकडे Lenovo Z5 स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट सह लॉन्च करण्यात आला आहे, त्याचबरोबर यात तुम्हाला 6GB च्या रॅम सह 64GB ची स्टोरेज आणि 128GB चे स्टोरेज ऑप्शन मिळतात.
कॅमेरा
लेनोवो Z5 फोन च्या बॅक वर एक ड्यूल कॅमेरा सेटअप आहे, जो 16-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सल च्या कॉम्बो सह येतो. फोन मध्ये एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे. हा कॅमेरा AI क्षमते सह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच Xiaomi Redmi Note 5 Pro कंपनी चा पहिला फोन आहे ज्यात डुअल कॅमेरा वर्टिकली प्लेस आहे. नवीन फोन Redmi Note 5 Pro मध्ये 12MP + 5MP चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 12MP चा प्राइमरी कॅमेरा (सोनी IMX486) मिळत आहे जो 1.25um साइज च्या सेंसर आणि f/2.2 अपर्चर सह येतो. दुसरा 5MP कॅमेरा डेप्थ सेंसिंग साठी आहे आणि याची सेंसर साइज 1.12um आहे ज्याचा अपर्चर f/2.0 आहे.
बॅटरी
बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर Lenovo Z5 स्मार्टफोन मध्ये एक 3,300mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे जी 18W फास्ट चार्जर सह येते. तसेच कंपनी चे म्हणेन आहे की हा 45 दिवसांचा स्टँडबाय टाइम आणि जवळपास शून्य टक्के चार्ज सह 30 मिनिटांचा टॉकटाइम देण्यास सक्षम आहे. Redmi Note 5 Pro मध्ये कंपनी ने एक मोठी 4000mAh ची बॅटरी पण दिली आहे. या फोन मध्ये एक मोठा डिस्प्ले असल्यामुळे ही बॅटरी याला चांगला बॅटरी बॅकअप देईल.
किंमत
Lenovo Z5 डिवाइस च्या किंमती बद्दल बोलायचे झाले तर हा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह RMB 1,399 म्हणजे जवळपास Rs 14,500 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, हा याचा बेस मॉडेल आहे. तसेच याचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट RMB 1,799 म्हणजे जवळपास Rs 18,500 मध्ये घेता येईल. तर याचा बेस वेरिएंट पाहता हा RMB 1,299 म्हणजे जवळपास Rs 13,500 च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. तसेच Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन पण भारतात दोन वेरियंट मध्ये सादर करण्यात आला आहे- 4GB रॅम वेरियंट आणि 6GB रॅम वेरियंट. याच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंट ची किंमत Rs. 16,999 आहे, तर याच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंट ची किंमत Rs. 13,999 ठेवण्यात आली आहे.
आमचा निर्णय
जसे की तुम्हाला माहिती आहे की Lenovo Z5 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला गेला नाही, त्यामुळे आता त्याच्याविषयी बोलणे घाईचे ठरेल. याचे स्पेक्स बघता हा डिवाइस Xiaomi Redmi Note 5 Pro पेक्षा चांगला वाटतो, पण कागदावर आणि प्रत्यक्ष वापर यात सर्वच स्मार्टफोंस मध्ये फरक असतो. विशेष म्हणजे Lenovo Z5 बद्दल अजूनतरी कोणतीच माहिती मिळाली नाही की हा भारतात केव्हा लॉन्च होईल, तसेच हा लॉन्च होईल की नाही याविषयी पण काहीच माहिती मिळाली नाही. पण एवढे मात्र नक्की की जेव्हा हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होईल तेव्हा अनेक स्मार्टफोंसना चांगली टक्कर मिळेल आणि या लिस्ट मध्ये पहिले नाव Xiaomi Redmi Note 5 Pro चे असेल.