तुम्हाला माहितीच आहे Xiaomi Redmi Note 5 Pro हा एक असा स्मार्टफोन जो कमी किंमतीत काही हाई-एंड स्पेक्स सह लॉन्च केला गेला आहे, ज्यामुळे हा एक बेस्ट सेलर स्मार्टफोन आहे. याची वाढत्या मागणी मुळे जेव्हा पण हा स्मार्टफोन सेल साठी आला, तेव्हा तेव्हा काही वेळाताच सोल्ड आउट झाला. हा डिवाइस ऑफलाइन पण विकत घेणे कठीण आहे, कारण हा घेण्यासाठी यूजर्सना लांब रांगेत उभे रहावे लागेल. वरून तुम्हाला याच्या किंमती पेक्षा ऑफलाइन बाजारात 2-3 हजार जास्त द्यावे लागतील. यूजर्स याला जास्त किंमतीत घेत पण आहेत कारण ऑनलाइन वरून हा स्मार्टफोन घेणे त्याहीपेक्षा कठीण आहे.
याच्या 6GB रॅम वेरिएंट ची तेवढी मागणी नाही, पण याच्या 4GB रॅम वेरिएंट साठी सर्व जण उत्सुक आहेत. ज्यांना हा मिळाला ते खुष आहेत. पण आता अशी बातमी आली आहे की ज्यामुळे सर्व नाराज झाले आहेत. ती बातमी अशी आहे की या स्मार्टफोन च्या 4GB रॅम वेरिएंट च्या किंमतीत Rs 1000 ची वाढ करण्यात आली आहे. हा डिवाइस नवीन किंमतीत म्हणजेच Rs 14,999 च्या किंमतीत 1 मे 2018 पासून विकत घेता येईल, याआधी या डिवाइस ची किंमत Rs 13,999 होती.
काही दिवसांपूर्वी असे वाटत होते की या डिवाइस ची किंमत कमी होईल, कारण बाजारात याला टक्कर देण्यासाठी जवळपास अशाच किंमतीत, जवळपास अशाच स्पेक्स सह Asus ने आपला Asus Zenfone Max Pro M1 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा डिवाइस आल्या नंतर असे वाटत होते की कंपनी Xiaomi Redmi Note 5 Pro डिवाइस ची किंमत कमी होईल, पण झाले उलटेच. कदाचित ही या कंपनी ची रणनीति म्हणू शकतो, किंवा कंपनी ने यामागे दिलेले कारण आहे, तेही योग्य आहे. पण आता प्रश्न उद्भवतो की जर Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन किंमत वाढल्याने बाजारातील इतर स्मार्टफोन्स चांदी होईल का? आज आपण तेच जाणून घेणार आहोत की या वाढलेल्या किंमती मुळे या स्मार्टफोन ला इतर स्मार्टफोन टक्कर देऊ शकतील का ते. चला तर जाणून घेऊया त्या स्मार्टफोंस बद्दल ज्यांचा फायदा होणार आहे.
या स्मार्टफोन च्या किंमती बद्दल बोलायचे तर याच्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत 10,999 रूपये आहे. तर डिवाइस च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत 12,999 रूपये आहे. यात एक 5.99-इंचाचा FHD+ डिस्प्ले 2180×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह मिळत आहे आणि फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर सह लॉन्च केला गेला आहे.
फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत आहे, यात तुम्हाला एक 13-मेगापिक्सल आणि एक 5-मेगापिक्सल चा ड्यूल सेंसर मिळत आहे. सोबतच फोन मध्ये एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. याव्यतिरिक्त फोन मध्ये तुम्हाला रियर कॅमेरा सह एक LED फ्लॅश मिळत आहे, तसेच तुम्हाला फ्रंट कॅमेरा सोबत एक सॉफ्ट फ्लॅश आहे. फोन मध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे. त्याचबरोबर यात एंड्राइड 8.1 Oreo सह 5,000mAh क्षमता असलेली बॅटरी आहे.
Honor 9 Lite स्मार्टफोन च्या फीचर्स आणि स्पेक्स बद्दल बोलायचे तर स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 5.65-इंचाचा FHD+ 2160×1080 पिक्सेल रेजोल्यूशन वाला डिस्प्ले मिळत आहे. ही स्क्रीन 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह येते. स्मार्टफोन मध्ये ओक्टा-कोर किरिन 650 CPU देण्यात आला आहे. तसेच यात तुम्हाला एक 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज ऑप्शन सह एक 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज वाला वेरिएंट पण मिळत आहे.
स्मार्टफोन चा सर्वात खास फीचर याचा क्वाड-कॅमेरा सेटअप आहे. यात एक 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा ड्यूल कॅमेरा सेटअप फोन च्या फ्रंट आणि रियर ला आहे. या दोन्ही कॅमेरा सह तुम्ही 1080 पिक्सल रेजोल्यूशन वाली पोर्ट्रेट मोड वाली विडियो रेकॉर्ड करू शकता. फोन एंड्राइड 8.0 Oreo सह लॉन्च करण्यात आला आहे, त्याचबरोबर यात एक 3,000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. फोन ब्लॅक, ब्लू, ग्रे रंगात घेता येईल. या स्मार्टफोन च्या 3GB रॅम वाल्या वर्जन ची किंमत Rs. 10,999 आहे. तर याच्या 4GB रॅम वाल्या वर्जन ची किंमत Rs. 14,999 आहे.
Moto G5S Plus स्मार्टफोन ची सर्वात मोठी खासीयत याचा डुअल कॅमेरा सेटअप आहे. या डिवाइस मध्ये दोन 13 मेगापिक्सल चे सेंसर्स आहेत. जे होरिजोंटली आहेत आणि ही f/2.0 अपर्चर सह येतात. याच्या डुअल कॅमेरा चा वापर तुम्ही पोर्ट्रेट साठी बोकेह इफेक्ट, ब्लॅक आणि वाइट कलर सेलेक्ट करण्यासाठी आणि बॅकग्राउंड मोड बदलण्यासाठी करू शकता. याच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा वाइड-एंगल सेल्फी कॅमेरा आहे जो LED फ्लॅश आणि पॅनोरमिक मोड सह येतो.
Moto G5S Plus मध्ये 5.5 इंचाचा फुल HD डिस्प्ले आहे जो 1920 x 1080 पिक्सल च्या रेजोल्यूशन सह येतो. या हँडसेट मध्ये 2.0GHz ओक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे जी मेमरी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवता येते. हा फोन एंड्राइड 7.1.1 नौगट वर चालतो आणि नाईट डिस्प्ले तसेच क्विक रिप्लाई सारख्या इंटरेस्टिंग फीचर्स सह येतो. या डिवाइस मध्ये 3000mAh ची बॅटरी आहे आणि ही टर्बो चार्जिंग टेक्नोलॉजी सह येतो. या डिवाइस ची किंमत Rs 15,999 आहे.
या फोनची सर्वात मोठी खासियत याचे बारीक किनारे आणि डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. Honor 7X मध्ये 4GB च्या रॅम सह 32GB आणि 64GB स्टोरेज चे ऑप्शन मिळतात. 4GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरियंट ची किंमत Rs. 12,999 आहे, तर याच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंट ची किंमत Rs. 15,999 आहे.
या स्मार्टफोन मधील फीचर्स पाहता Honor 7X मध्ये 5.93 इंचाचा LCD डिस्प्ले आहे जो 2160 x 1080p च्या रेजोल्यूशन सह येतो. या डिवाइस मध्ये किरिन 659 चिपसेट आहे. या हँडसेट मध्ये माइक्रो SD कार्ड स्लॉट पण उपलब्ध आहे. Honor 7X मध्ये 16MP+2MP चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि याच्या फ्रंटला 8MP चा कॅमेरा आहे. हा हँडसेट EMUI 5.1 सह एंड्राइड 7.0 नूगा वर चालतो आणि या डिवाइस मध्ये एक रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे. या डिवाइस मध्ये 3340 mAh बॅटरी आहे आणि चार्जिंग साठी हा डिवाइस माइक्रो USB पोर्ट चा वापर करतो.