१ जूनपासून ओपन सेलमध्ये मिळणार शाओमी रेडमी नोट 3
शाओमी रेडमी नोट 3 स्मार्टफोन mi.com, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडिल वर सेलद्वारा उपलब्ध होईल.
फ्लिपकार्टवर खरेदी करा शाओमी रेडमी नोट 3 ११,९९९ रुपयात
गेल्या काही महिन्यांपासून स्मार्टफोन जगतात धुमाकूळ घातलेला स्मार्टफोन शाओमी रेडमी नोट 3 आता ओपन सेलमध्ये उपलब्ध होईल. ह्याच्याविषयी कंपनीचे इंडिया हेड मनू जैन यांनी घोषणा केली आहे. आपल्या ट्विटर अकाउंटद्वारा जैनने ही माहिती दिली आहे. रेडमी नोट 3 स्मार्टफोन mi.com, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडिलवर ओपन सेलमध्ये मिळेल.
कंपनीने रेडमी नोट 3 स्मार्टफोनला भारतात मार्च महिन्यात लाँच केले होते. हा दोन व्हर्जनमध्ये मिळतो आहे 2GB रॅमय16GB स्टोरेज आणि 3GB रॅम/32GB स्टोरेज. ह्याच्या पहिल्या व्हर्जनची किंमत ९,९९९ रुपये आहे. तर दुस-या व्हर्जनची किंमत ११,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
शाओमी रेडमी नोट ३ स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांवाषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण IPS डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल. हा स्मार्टफोन पुर्णपणे मेटल यूनीबॉडीने बनला आहे. ह्याचे वजन केवळ १६४ ग्रॅम आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसर दिले गेले आहे. असे पहिल्यांदाच घडत आहे की, भारतामध्ये ह्या प्रोसेसरमध्ये एखादा स्मार्टफोन लाँच झाला आहे. हा एक हेक्सा कोर प्रोसेसर आहे, ज्यात २ कोर्टेक्स-A72 कोर्स आणि 4 कोर्टेक्स-A53 कोर्सने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये एड्रेनो ५१० GPU सुद्धा दिला गेला आहे. स्मार्टफोन दोन स्टोरेज प्रकारामध्ये म्हणजेच 6GB/32GB मध्ये मिळेल, ज्यात क्रमश: 2GB आणि 3GB चे रॅम दिले गेल आहे. हा स्मार्टफोन सिल्वर, डार्क ग्रे आणि गोल्ड रंगात उपलब्ध होईल.
हेदेखील वाचा – कसा आहे नेक्स्टबिट रॉबिन: पाहा चित्रांच्या माध्यमातून
त्याचबरोबर १ जूनपासून शाओमी Mi 5 स्मार्टफोनसुद्धा ओपन सेलमध्ये मिळेल. मात्र हा फोन केवळ mi.com वर ओपन सेल केला जाईल.
हेदेखील वाचा – आसूसने लाँच केला आपला नवीन रोबोट ‘जेनबो’
हेदेखील वाचा – यू यूनिकॉर्न स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, किंमत १२,९९९ रुपये