मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने आपला नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 3 प्रो सादर केला आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनला चीनमध्ये सादर केले गेले आहे. ह्याची विक्री चीनमध्ये रविवारपासून सुरु होईल. शाओमी रेडमी नोट 3 प्रो स्मार्टफोनची किंमत ९९९ चीनी युआन (जवळपास १०,०००रुपये) ठेवण्यात आली आहे.
शाओमी रेडमी नोट 3 प्रो स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे, ह्यात मेटल बॉडी आणि रियर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे, हा डार्क ग्रे, शॅम्पेन गोल्ड आणि सिल्वर रंगात उपलब्ध होईल. शाओमीने ह्याची माहिती एक वीबो पोस्टद्वारे दिली आहे.
शाओमी रेडमी नोट 3 प्रो स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन हेक्सा-कोर स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसरने सुसज्ज असेल. हा स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध होईल. त्यातील एका प्रकारात 2GB रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज आणि दुस-या प्रकारात 3GB रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज उपलब्ध होईल.
ह्या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ह्यात 4000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. यूजर १ तास चार्ज करुन हँडसेटची 50 टक्के बॅटरी चार्ज होते. हा स्मार्टफोन जलद चार्जिंग फीचरने सुसज्ज आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम लॉलीपॉपवर आधारित एमआययुआय 7 वर काम करतो.