मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने आज चीनमध्ये आयोजित केलेल्या कॉन्फरन्समध्ये आपला नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 3 लाँच केला. फोनमध्ये फिंगरप्रिंटसारखे प्रीमियम फीचरसुद्धा दिले आहे. ह्या स्मार्टफोनची पुर्ण बॉडी मेटलची बनली आहे. असे पहिल्यांदा घडत आहे की, श्याओमीने पुर्ण मेटल बॉडी असलेला फोन लाँच केला आहे.
सध्यातरी हा फोन चीनमध्ये लाँच केला आहे. चीनमध्ये श्याओमी रेडमी नोट 3,899 युआन(जवळपास 9,499 रुपये) मध्ये लाँच केला आहे. मात्र भारतात हा स्मार्टफोन कधी उपलब्ध होईल याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
श्याओमी रेडमी नोट 3 स्मार्टफोन सोनेरी, चंदेरी आणि राखाडी ह्या तीन रंगात उपलब्ध होईल. तसेच लीक झालेल्या रेडमी नोट 3 यूनीबॉडी मेटलने बनवला आहे आणि बॅक पॅनलमध्ये फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे.
जर श्याओमी रेडमी नोट ३ स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांवाषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920×1280 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलियो X10 चिपसेट, 2GHz ६४ बिट्स ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 16GB च्या अंतर्गत स्टोरेजसह 2GB ची रॅम आणि 32GB च्या अंतर्गत स्टोरेजसह 3GB रॅम उपलब्ध आहे.
त्याचबरोबर ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. श्याओमी रेडमी नोट 3 अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.0 लॉलीपॉपसह मीयुआय ७ वर चालतो. ह्यात 4000mAh ची बॅटरीसुद्धा दिली आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 3G, 4G LTE सपोर्ट, ब्लूटुथ, वायफाय आणि GPS उपलब्ध आहे. हा यूनीबॉडी डिझाईनसह सादर केला आहे. फोनमध्ये ड्युल सिम सपोर्ट आहे आणि आपण दोन्ही सिममध्ये 4G वापरु शकता. हा आपल्याला सोनेरी, चंदेरी आणि राखाडी रंगात उपलब्ध होईल.