मोबाईल निर्माता कंपनी श्याओमी आपला नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 2 प्रो ला 24 नोव्हेंबरला लाँच करु शकतो. खरे पाहता, ह्या स्मार्टफोनच्या लाँचच्या तारखेचे अंदाज चीनची सोशल मिडिया साइट विवोवर कंपनीच्या पोस्टच्या आधारावर लावला जात आहे.
ह्या पोस्टसह एक टीजर इमेजसुद्धा देण्यात आली आहे. ह्या टीजर इमेजवर चीनी भाषेमध्ये लिहिले आहे की, ‘ग्रँड फिनाले’. त्याचबरोबर ह्याच्या लाँचच्या तारखेचा उल्लेखही केला आहे. तथापि, टीजर इमेजमध्ये रेडमी नोट 2 च्या लाँचविषयी काही उल्लेख केलेला नाही.
त्याचबरोबर माय ड्रायवर्स वेबसाइट अनुसार, ह्या कार्यक्रमाचे आयोजन बिजिंग नॅशनल कन्वेंशन सेंटरमध्ये केले जाईल.श्याओमी रेडमी नोट २ प्रो ला मागील आठवड्यात चीनच्या सर्टिफिकेशन वेबसाइट टीनावर लिस्ट केले होते.
ह्याआधी श्याओमी रेडमी नोट 2 प्रो स्मार्टफोनच्या लीक झालेल्या काही फोटोंवरुन, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले असू शकते. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 2.2GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6795 प्रोसेसर, पॉवर VR G6200 GPU आणि 2GB रॅमने सुसज्ज असू शकतो.
ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असण्याची शक्यता आहे. हा 3060mAh बॅटरीने सुसज्ज असण्याची शक्यता आहे. .