Xiaomi Redmi 6 Series 12 जूनला करू शकते लॉन्च…
कालच Xiaomi ने वेइबो वर याची माहिती दिली आहे की ते आज काही तरी नवीन करणार आहे. त्यानंतर असे समोर येत आहे की कदाचित कंपनी चीन मध्ये Xiaomi Redmi 6 Series सादर करू शकते पण आता वेगळीच बातमी येत आहे.
कालच Xiaomi ने वेइबो वर याची माहिती दिली आहे की ते आज काही तरी नवीन करणार आहे. त्यानंतर असे समोर येत आहे की कदाचित कंपनी चीन मध्ये Xiaomi Redmi 6 Series सादर करू शकते पण आता वेगळीच बातमी येत आहे. आज कंपनी ने वेइबो वर एक नवीन पोस्टर जारी केला आहे, ज्या नुसार कंपनी Xiaomi Redmi 6 किंवा Xiaomi Redmi 6 Series 12 जूनला सादर करू शकते.
काही दिवसांपूर्वी म्हणजे 31 मे ला शेनजेन मध्ये झालेल्या आपल्या एका इवेंट मध्ये आपला Xiaomi Mi 8 स्मार्टफोन, Xiaomi Mi Band 3 आणि MIUI 10 सादर केल्यानंतर एक नवीन डिवाइस ज्याचा मॉडेल नंबर M1805D1SE आहे दिसला होता, हा एक मिड-रेंज स्मार्टफोन असल्याचे बोलले जात आहे. हा डिवाइस पण 31 मे ला लॉन्च करणे ठरले होते पण त्यावेळी हा लॉन्च करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की काही दिवसांपूर्वी सर्टिफिकेशन साइट वर दिसलेला हा डिवाइस Xiaomi Redmi 6 स्मार्टफोन नावाने लॉन्च केला जाणार आहे.
खाली दिलेल्या या पोस्टर वरून समोर येत आहे की Xiaomi Redmi 6 स्मार्टफोन 12 जूनला लॉन्च केला जाऊ शकतो. पण या बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही की या दिवशी एकच डिवाइस लॉन्च केला जाईल किंवा जास्त स्मार्टफोंस या दिवशी लॉन्च केले जाऊ शकतात. असे पण समोर येत आहे की या दिवशी Redmi 6A आणि Redmi 6 Pro/Plus स्मार्टफोंस पण Xiaomi Redmi 6 सोबत लॉन्च केले जाऊ शकतात.
TENAA वरील लिस्टिंग बद्दल बोलायचे झाले तर हा मॉडेल नंबर इथे पण दिसला होता. हा डिवाइस 149.33 x 71.68 x 75mm चा सांगितला जात आहे आणि याचे 178 ग्राम वजन असल्याची बाब समोर येत आहे. असे पण समोर येत आहे की हा असा पहिला Xiaomi बजेट स्मार्टफोन असेल जो नॉच डिजाईन सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोन मध्ये एक 5.84-इंचाची FHD+ स्क्रीन 2280×1080 पिक्सल सह असू शकते.
त्याच बरोबर अशी पण माहिती मिळत आहे की हा डिवाइस एका ओक्टा-कोर प्रोसेसर सह लॉन्च केला जाणार आहे ज्याचा क्लॉक स्पीड 2.0GHz असेल. असे बोलले जात आहे की डिवाइस मध्ये एक क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट असू शकतो. हा फोन अनेक रॅम ऑप्शन्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. यात 2GB/3GB/4GB च्या रॅम सह 16GB/32GB/64GB इंटरनल स्टोरेज पण असू शकते.