Xiaomi Redmi 6 Pro च्या लाइव फोटो वरून मिळाली ही माहिती
लीक झालेल्या फोटो वरून डिस्प्ले मधील नॉच ची माहिती मिळाली आहे सोबत अशी पण माहिती मिळत आहे की डिस्प्ले चा एस्पेक्ट रेश्यो 19:9 असेल.
Xiaomi Redmi 6 Pro live image surfaced online: Xiaomi ने खुलासा केला होता कि 25 जूनला चीन मध्ये कंपनी एका इवेंट मध्ये Xiaomi Redmi 6 Pro स्मार्टफोन लॉन्च करेल अधिकृत लॉन्च च्या आधीच डिवाइस चे लाइव फोटो समोर आले आहेत ज्या वरून अंदाज लावला जात आहे की डिवाइस कसा दिसेल. लीक झालेल्या फोटो वरून डिस्प्ले मधील नॉच ची माहिती मिळाली आहे सोबत अशी पण माहिती मिळत आहे की डिस्प्ले चा एस्पेक्ट रेश्यो 19:9 असेल. हे फोटो चीन च्या माइक्रोब्लॉगिंग पोर्टल Weibo वर दिसला आहे, पोर्टल वर डिवाइस च्या स्पेसिफिकेशंस संबंधित कोणतीही माहिती समोर आली नाही. फोटो बघून असे वाटते की Xiaomi नॉच चा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आपल्या MIUI ला कस्टमाइज करेल. पण, डिवाइस च्या बॉटम मधील मोठी चिन विचित्र वाटते.
डिस्प्ले मध्ये नॉच डिजाइन असण्याचे कारण डिस्प्ले चा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो वाढवणे हे आहे. हे तर नक्की आहे की आगामी Redmi 6 Pro मध्ये सध्या असलेल्या Redmi डिवाइस च्या तुलनेत मोठया स्क्रीन वाला डिवाइस असेल आणि असे पण असू शकते की याचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो Apple iPhone X किंवा Mi Mix 2 च्या आसपास असेल.
डिवाइस च्या बॅक वर डुअल वर्टिकल कॅमेरा आहे ज्याला वर्टिकली जागा देण्यात आली आहे, जो Apple iPhone X सारखा वाटतो. एक टिप्स्टर ने पण अबाउट फोन सेक्शन चा फोटो पोस्ट केला होता, ज्यावरून अजून काही माहिती मिळाली आहे. Redmi 6 Pro एंड्राइड 8.1 ओरियो वर आधारित MIUI 9.6 वर चालेल. डिवाइस मध्ये 2.0GHz ओक्टा-कोर प्रोसेसर असेल. Xiaomi या स्मार्टफोनला मीडियाटेक हेलियो P23 किंवा हेलियो P60 चिपसेट सह लॉन्च करू शकते, कारण Redmi 6 आणि Redmi 6A Helio P22 आणि A22 चिपसेट सह लॉन्च करण्यात आला आहे.
TENAA लिस्टिंग वरून खुलासा झाला होता कि डिवाइस वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल आणि लीक झालेल्या फोटो मध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज दाखवण्यात आली आहे. बोलले जात आहे की Redmi 6 Pro मध्ये 5.84 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले असेल आणि डिवाइस 4000mAh च्या बॅटरी सह लॉन्च केला जाईल.