Xiaomi Redmi 5A च्या 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज मॉडल किंमत आता झाली आहे 5,999 रुपये

Xiaomi Redmi 5A च्या 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज मॉडल किंमत आता झाली आहे 5,999 रुपये
HIGHLIGHTS

स्मार्टफोन निर्माता ने आपल्या पहिल्या 5 लाख ग्राहकांसाठी 1,000 रुपये डिस्काउंट सह स्मार्टफोन लॉन्च केला होता आणि आता याचा बेस वेरियंट 4,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

शाओमी च्या 'देशाच्या स्मार्टफोन' चा बेस वेरियंट Redmi 5A आता फ्लिपकार्ट, Mi.com आणि Mi होम्स वर 5,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. लॉन्च च्या वेळेस स्मार्टफोन निर्माता ने बेस वेरियंट वर पहिल्या 5 लाख ग्राहकांसाठी 1 हजार रुपयांच्या डिस्काउंट ची घोषणा केली होती, ज्यामुळे याची प्रभावी किंमत कमी होऊन 4,999 रुपये झाली आहे. 
याला 2 वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आले होते, पहिला 5,999 रुपयांच्या किंमती वर 2 जीबी रॅम/16 जीबी सह आणि दूसरा 6,999 रुपयांच्या किंमती 3 जीबी रॅम/32 जीबी स्टोरेज सह. 
 
कंपनी ने एक ट्वीट मधून याची घोषणा केली, ज्यात लिहिले होते, "Redmi 5A आता https://mi.com आणि @ फ्लिपकार्ट वर 5,999 रुपयांच्या किमतींवर उपलब्ध होतील. #DeshKaSmartphone स्पेसिफिकेशन च्या बाबतीत बोलायाचे झाले तर, Redmi 5A क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 एसओसी वर चालतो आणि यात 5 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. 
याच्या इंटरनल स्टोरेज ला माइक्रोएसडी कार्ड ने 128 जीबी पर्यंत एक्सपांड करता येईल आणि हा 3,000 एमएएच च्या बॅटरी सह येतो. हा डिवाइस MIUI 9 वर चालतो. कॅमेरा बद्दल बोलायाचे झाले तर यात f/2.2 अपर्चर, PDAF, आणि LED फ्लॅश वाला 13MP चा रियर कॅमेरा आहे आणि 5MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. 
Xiaomi 14 मार्चला भारतात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल, जो Redmi 5 असू शकतो. याला एक कॉम्पॅक्ट पावरहाउस फोन च्या रुपाने टीज करण्यात येत आहे, जो एक अमेजॉन एक्सक्लूसिव डिवाइस असेल. ऑनलाइन रिटेलर कडे या आगामी स्मार्टफोन साठी एक डेडिकेटेड वेबपेज आहे, ज्यावरून हा डिवाइस Redmi 5 असण्याचे संकेत मिळत आहेत. 
Redmi 5 मध्ये बारीक-बेजल सह मेटल यूनिबॉडी डिजाइन आहे आणि हा चीन मध्ये आधी पासून उपलब्ध आहे. हा 1440x720p रिजॉल्यूशन सह 7 इंचाच्या HD+ स्क्रीन सह येतो आणि हा ओक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर वर चालतो. हा 1.25 माइक्रोन पिक्सल सेंसर सह एका 12 एमपी च्या रियर कॅमेरा आणि 5 एमपी च्या फ्रंट सेंसर सह येतो. या डिवाइस मध्ये 3300 एमएएच चा बॅटरी सपोर्ट आहे, तसेच यात एक रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. 
चीन मध्ये, या स्मार्टफोन चा 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज वेरियंट CNY 799 (जवळपास Rs 7,800) रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर याचा 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरियंट CNY 899 (जवळपास 8,800 रुपये) मध्ये उपलब्ध आहे. 
सोबतच हा 4GB रॅम वेरियंट मध्ये पण अपग्रेड करण्यात आला आहे, ज्याची किंमत CNY 1,099 (जवळपास 11,200 रुपये) आहे. या मोबाइल फोन ची किंमत भारतात कमी होण्याची शक्यता आहे कारण काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या Redmi Note 5 ची किंमत 9,999 रुपयांपासून सुरू होत आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo