Xiaomi Redmi 5 भारतात लॉन्च साठी तयार, लॉन्च इवेंट होणार लाइव स्ट्रीम

Xiaomi Redmi 5 भारतात लॉन्च साठी तयार, लॉन्च इवेंट होणार लाइव स्ट्रीम
HIGHLIGHTS

या फोन चे अनावरण ऑनलाइन इवेंट च्या माध्यमातून केले जाईल, स्नॅपड्रॅगन 450 एसओसी सह येईल हा डिवाइस.

Xiaomi एक नवीन बजेट फोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे, हा फोन Redmi 5 असू शकतो. बुधवारी म्हणजे आज 3 वाजता भारतात नवीन फोन लॉन्च केला जाईल. कंपनी ने हा स्मार्टफोन 'कॉम्पॅक्ट पावरहाउस' च्या रुपात टीज केला आहे, ज्यात मोठी स्क्रीन, उत्तम बॅटरी लाइफ, स्लीम डिजाइन आणि फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. 
Mi LED स्मार्ट टीवी 4A च्या लॉन्च प्रमाणे, कंपनी आपल्या वेबसाइट, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या अन्य सोशल मीडिया च्या माध्यमातून या इवेंट ला पण लाइव स्ट्रीम करणार आहे. 
Xiaomi Redmi 5 ची किंमत Redmi 5A आणि Redmi Note 5 च्या मध्ये असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोन ला चीन मध्ये 3 वेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आले होते. 2GB रॅम/16GB स्टोरेज, 3GB रॅम/32GB स्टोरेज आणि 4GB रॅम/64GB स्टोरेज, ज्यांची किंमत क्रमश: CNY 799 (जवळपास Rs 8,200), CNY 899 (जवळपास Rs 9,300) आणि CNY 1,099 (जवळपास Rs 11,300) आहे. 
Redmi 5 मध्ये 18:9 एस्पेक्ट रेशियो डिस्प्ले सह एक मेटल बॉडी डिजाइन आहे. 5.7 इंच स्क्रीन चा हा फोन बारीक बेजल सह येईल. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 एसओसी वर चालतो. 

हा डिवाइस 12MP च्या रियर आणि 5MP च्या फ्रंट कॅमेरा सह येईल. फोन ची बॅटरी 3300 एमएएच ची आहे आणि फिंगरप्रिंट सेंसर बॅक साइडला आहे. कनेक्टिविटी ऑप्शन बद्दल बोलायाचे झाले तर यात वायफाय, ब्लूटूथ 4.2, A -जीपीएस, 3.5mm हेडफोन जॅक ला सपोर्ट करतो आणि चार्जिंग साठी माइक्रो-यूएसबी पोर्ट आहे.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo