आज दुपारी 12 वाजल्यापासून अमेजॉन इंडिया आणि मी.कॉम वर सेल साठी येईल Xiaomi Redmi 5 स्मार्टफोन
आज Xiaomi Redmi 5 स्मार्टफोन चा पहिला सेल होणार आहे, कंपनी ने हा स्मार्टफोन Rs. 7,999 च्या सुरुवाती किमतींवर लॉन्च केला आहे आणि यात अनेक शानदार फीचर्स आहेत.
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi आज भारतात आपला काही दिवसांपूर्वी लॉन्च केलेला कॉम्पॅक्ट स्मार्टफोन Xiaomi Redmi 5 च्या सेल चे आयोजन करत आहे, हा स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजल्यापासून अमेजॉन इंडिया आणि मी.कॉम च्या माध्यमातून सेल केला जाणार आहे. हा स्मार्टफोन भारतात Rs. 7,999 च्या सुरुवाती किंमतीत लॉन्च केला गेला आहे.
हा स्मार्टफोन कंपनी ने मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये चीन मध्ये लॉन्च केला आहे, याव्यतिरिक्त कंपनी या स्मार्टफोन सह याचा एक मोठा वर्जन म्हणजे Xiaomi Redmi 5 Plus स्मार्टफोन पण लॉन्च केला होता. पण कंपनी ने Xiaomi Redmi 5 Plus स्मार्टफोन ला भारतात Redmi Note 5 स्मार्टफोन या नावाने लॉन्च केले आहे. आता पहावे लागेल की हा स्मार्टफोन पण कंपनी चा भारतातील दबदबा कायम ठेवण्यात यशस्वी होतोय की नाही ते.
Xiaomi Redmi 5 स्मार्टफोन ला 5.7-इंचाच्या HD+ रेजोल्यूशन वाल्या डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आले आहे, तसेच यात 1440×720 पिक्सल रेजोल्यूशन आहे. हा स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या स्क्रीन सह लॉन्च करण्यात आला आहे.
स्मार्टफोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर देण्यात येत आहे, सोबतच यात तुम्हाला 2GB च्या रॅम सह 16GB ची इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त हा स्मार्टफोन एका 32GB स्टोरेज वर्जन मध्ये पण लॉन्च करण्यात आला आहे, जो तुम्हाला 3GB रॅम आणि 4GB रॅम ऑप्शन मध्ये मिळू शकतो.
फोन मध्ये तुम्हाला एक 12-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सल चा एक सेकेंडरी कॅमेरा मिळत आहे. हे दोन्ही कॅमेरा वापरून तुम्ही 1080 विडियो रेकॉर्डिंग करू शकता. फोन एंड्राइड 7.0 नौगट वर चालतो आणि यात एक 3300mAh क्षमता असलेली एक बॅटरी पण मिळत आहे. तसेच याच्या किंमती बद्दल बोलायाचे झाले तर याच्या बेस वेरिएंट म्हणजे 2GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज वाला वेरिएंट तुम्ही Rs. 7,999 च्या किंमतीत घेऊ शकता, तसेच 3GB रॅम आणि 4GB रॅम वाल्या वेरिएंटस क्रमश: Rs. 8,999 आणि Rs. 10,999 च्या किंमतीत विकत घेतला जाऊ शकतो.