Xiaomi Redmi 5, Xiaomi Mi TV 4 आणि Mi TV 4A पुन्हा एकदा सेल साठी यादिवशी होतील उपलब्ध

Updated on 02-Apr-2018
HIGHLIGHTS

Xiaomi Redmi 5, Xiaomi Mi TV 4 आणि Mi TV 4A पुन्हा एकदा 5 एप्रिलला सेल साठी येतील, तुमच्याकडे हे विकत घेण्यासाठी आहे एक अजून खास संधी.

आपल्या काही स्मार्टफोंस आणि स्मार्ट TV ला भारतात लॉन्च केल्या नंतर कंपनी याना सेल साठी आणणे सुरू केले होते आणि आता पर्यंत हे सेल साठी येतच आहेत. या प्रोडक्ट्स मध्ये Xiaomi Redmi Note 5, Xiaomi Redmi Note 5 Pro, Xiaomi Redmi 5, Xiaomi Mi TV 4 आणि Xiaomi Mi TV 4A समाविष्ट आहेत. 
जसे की तुम्हाला माहित आहेच की हे प्रोडक्ट्स आता काही दिवसांपूर्वीच सेल साठी आले होते. आता हे सर्व डिवाइस 5 एप्रिल ला एकदा पुन्हा सेल साठी येणार आहेत. हा सेल 12 वाजता सुरू होणार आहे. जर तुम्ही Xiaomi Redmi 5, Xiaomi Mi TV 4 आणि Xiaomi Mi TV 4A विकत घेऊ शकला नाहीत आणि विकत घेऊ इच्छित असाल तर तुमच्याकडे ही सुवर्णसंधी आहे, 5 एप्रिल ला हे डिवाइस विकत घेण्याची. 

Xiaomi आपल्या या स्मार्टफोन म्हणजे Xiaoami Redmi 5 ला फक्त एका फ्लॅश सेल मॉडल च्या रुपात सेल करत आहे. याचा अर्थ असा की ज्या लोकांना हा स्मार्टफोन घ्यायचा आहे त्यांना याला विकत घेण्याआधी यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. या स्मार्टफोन साठी अमेजॉन इंडिया आणि Mi.com वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. हा स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या रॅम आणि और स्टोरेज वेरिएंटस मध्ये लॉन्च केले गेले आहे. 

या स्मार्टफोन चा 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज वेरिएंट तुम्हाला फक्त Rs 7,999 च्या किंमतीत मिळेल, याव्यतिरिक्त याचा 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट Rs 8,999 च्या किंमतीत मिळू शकतो. तसेच याला 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह पण लॉन्च करण्यात आले आहे आणि या मॉडेल ची किंमत Rs 10,999 आहे. या स्मार्टफोन ला चार वेगवेगळ्या रंगात सादर करण्यात आले आहे, यात ब्लू, गोल्ड, ब्लॅक आणि रोज गोल्ड वेरिएंट येतात. 

स्मार्टफोन सह जियो यूजर्स साठी Rs 2200 ची कॅशबॅक ऑफर पण मिळत आहे. हा कॅशबॅक तुम्हाला Rs 50 मध्ये येणार्‍या 44 वाउचर च्या माध्यमातून तुमच्या MyJio App मध्ये दिला जाईल. तसेच तुम्हाला रिलायंस जियो कडून या स्मार्टफोन सोबत 100GB एक्स्ट्रा डेटा मिळत आहे. हा पण तुम्हाला 10GB च्या वेगवेगळ्या 10 वाउचर च्या माध्यमातून दिला जाणार आहे. जास्त माहिती साठी तुम्ही अमेजॉन इंडिया किंवा Mi.com वर जाऊन याविषयी सविस्तर वाचू शकता. 

Xiaomi Redmi 5 स्मार्टफोन 5.7-इंचाच्या HD+ रेजोल्यूशन वाल्या डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे, याव्यतिरिक्त हा 1440×720 पिक्सल रेजोल्यूशन सह या फोन मध्ये आहे. तसेच हा स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या स्क्रीन सह लॉन्च केला गेला आहे. 

याव्यतिरिक्त जर Xiaomi Mi TV 4 आणि Mi TV 4A डिवाइस इत्यादी बद्दल बोलायचे झाले तर Mi TV 4 ची किंमत 39,999 रूपये आहे आणि याची स्क्रीन साइज 55 इंच आहे. Xiaomi चे म्हणणे आहे की हा टेलिविजन 500,000 तासांपेक्षा जास्त ऑफर करतो, ज्यात जवळपास 80 टक्के कंटेंट फ्री असेल, जो Hotstar, Voot, Voot Kids, Sony Liv, Hungama Play, Zee5, Sun NXT, ALT Balaji, Viu, TVF, आणि Flickstree सारख्या पार्टनर्स च्या माध्यमातून ऑफर केला जाईल, हा कंटेंट 15 भाषांमध्ये उपलब्ध होईल. 

स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर Mi TV 4 मॉडेल मध्ये 4K रिजॉल्यूशन, HDR आणि LED डिस्प्ले आहे आणि याची रुंदी 4.9mm आहे. याचा पॅनल 178 डिग्री व्यूइंग एंगल आणि 8ms रिस्पॉन्स टाइम ऑफर करतो. हा टीवी 64 बिट क्वॉड कोर एम्लॉजिक कॉर्टेक्स A53 SoC वर चालतो आणि यात Mali-T830 ग्राफिक्स आहे. 

हा 2GB रॅम आणि 8GB स्टोरेज सह येतो. यात डॉल्बी+DTS सिनेमा ऑडियो सह 2 8W डक्ट इनवर्टेड स्पीकर फीचर आहे. याव्यतिरिक्त यात भारतीय बाजारासाठी शाओमी चा AI संचालित पॅचवॉल UI पण आहे. 

Xiaomi च्या Mi LED Smart TV 4A च्या दोन्ही मॉडेल 32 इंच आणि 43 इंच सेल साठी उपलब्ध होतील ज्यांची किंमत क्रमश: Rs. 13,999 आणि Rs. 22,999 आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर या 43 इंचाच्या फुल एचडी डिस्प्ले चे रेजोल्यूशन (1920×1080 पिक्सल)आहे तर 32 इंचाच्या मॉडेल च्या डिस्प्ले चे रेजोल्यूशन 1366×768 पिक्सल आहे आणि या TV मध्ये फुल एचडी डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्ले पॅनल मध्ये 178 डिग्री व्यूइंग एंगल आणि 60Hz रिफ्रेश रेट आहे. दोन्ही Mi TV 4A मॉडेल एमलॉजिक क्वॉड कोर SoC वर चालतात. सोबतच यात 1GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :