शाओमी रेडमी 4ए ला आता मिळत आहे MIUI 9.2.6.0 नाइट्ली ग्लोबल स्टेबल रोम अपडेट
नवीन अपडेट MIUI 9.2.6 वर आधारित आहे, आणि हा नाइट्ली ग्लोबल स्टेबल रोम आहे. हा अपडेट आधी नेमक्या यूजर्स साठी उपलब्ध होईल, त्यानंतर फीडबॅक घेऊन शाओमी सर्व यूजर्स साठी स्टेबल रोम जारी करू शकते.
शाओमी ने आपल्या रेडमी 4ए स्मार्टफोन साठी MIUI 9.2 वर एंड्रॉयड 7.1.2 नूगा आधारित रोलिंग सुरू केली आहे. कंपनीच्या अधिकृत फोरम नुसार, नवीन अपडेट यूजर्सना पाठवण्यास सुरवात झाली असून हा अपडेट टप्प्याटप्प्याने रोलआउट होईल.
हे लक्षात असू द्या कि हा एक नाइट्ली अपडेट आहे आणि फोरम नुसार, काही यूजर्सना हा पाठवण्यात आला आहे आणि लवकरच स्टेबल रोम येईल अशी आशा आहे.
नवीन अपडेट ची साइज जवळपास 1.3GB आहे आणि हा सीरीज नंबर MIUI 9.2.6.0.NCCMIEK सह येईल. हा जानेवारी 2018 च्या सिक्योरिटी पॅच सह रेडमी 4ए ला पण अपडेट करेल आणि KRACK WPA2 Wi-Fi सिक्योरिटी च्या समस्येला फिक्स करेल.
या अपडेट मुळे फोनला नवीन गॅलरी अॅप, कॅलेंडर कार्ड, अॅप वॉल्ट, नवीन सिस्टम अॅनिमेशन, क्विक स्विच, नवीन एमआई एक्सप्लोरर सारखे नवीन MIUI 9 आधारित फीचर आणि UI अपडेट पण मिळेल.
शाओमी ने काही दिवसांपूर्वीच MIUI 10 ची घोषणा केली आहे आणि एका रिपोर्ट मधून नवीन अपडेट मिळणार्या फोन्सची लिस्ट पण लीक केली आहे. रिपोर्ट मध्ये 32 फोन्स आहेत. आशा आहे की हा नवीन इंटरफेस एंड्रॉयड ओरियो वर आधारित असेल तसेच रिपोर्ट नुसार, नवीन अपडेट आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग वर केंद्रित असेल.