शाओमी रेडमी नोट 3, मी 3 सह 32 फोन्सना लवकरच मिळू शकतो MIUI 10 अपडेट
By
Siddhesh Jadhav |
Updated on 12-Feb-2018
HIGHLIGHTS
रिपोर्ट नुसार शाओमी 32 फोन्स मध्ये MIUI 10 अपडेट देण्याची तयारी करत आहे. जो एंड्रॉयड ओरियो वर आधारित असेल.
शाओमी च्या MIUI 10 अपडेट ची घोषणा काही आठवड्यापूर्वी केली गेली होती, पण अस वाटतय की हा अपडेट मिळणार्या फोन्स ची यादी आधीच तयार होती. शाओमी टूडे च्या एका रिपोर्ट नुसार, शाओमी च्या 32 फोन्स ना हा अपडेट मिळेल. इथे आम्ही त्या फोन्स च्या नावांची लिस्ट देत आहोत, ज्यांना MIUI 10 अपडेट मिळेल.
शाओमी मी 6
शाओमी मी 5
शाओमी मी 5एस
शाओमी मी 5एस प्लस
शाओमी मी 4
शाओमी मी 3
शाओमी मी 4एस
शाओमी मी 4सी
शाओमी मी मिक्स
शाओमी मी मिक्स 2
शाओमी रेडमी वाय1
शाओमी रेडमी वाय1 लाइट
शाओमी मी नोट 2
शाओमी मी नोट 3
शाओमी रेडमी नोट 3
शाओमी रेडमी नोट प्रो
शाओमी रेडमी नोट 4
शाओमी रेडमी नोट 4एक्स
शाओमी रेडमी 5 प्लस
शाओमी रेडमी 5
शाओमी रेडमी 5ए
शाओमी मी 5एक्स
शाओमी मी मॅक्स
शाओमी मी मॅक्स 2
शाओमी रेडमी 4
शाओमी रेडमी 4एक्स
शाओमी रेडमी 4ए
शाओमी रेडमी 3
शाओमी रेडमी 3एस
शाओमी रेडमी प्राइम
शाओमी रेडमी प्रो
शाओमी रेडमी 3एक्स
शाओमी च्या वरिष्ठ उपाध्यक्ष, हांग फेंग यांनी MIUI 10 च्या बाबतीत घोषणा केली होती. अजून तरी इंटरफेस च्या संबंधित कोणतीही माहिती समोर आली नाही. नवीन इंटरफेस एंड्रॉयड ओरिओ वर आधारित असेल आणि रिपोर्ट नुसार हा अपडेट आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग वर केंद्रित असू शकतो.
काही आठवड्यापूर्वी, शाओमी ने रेडमी नोट 3 स्मार्टफोन सह सर्व फोन्सना MIUI 9 अपडेट दिला होता. हा अपडेट एंड्रॉयड नूगा वर आधारित होता, ओरिओ वर नाही. सध्या, शाओमी मी ए1 हा कंपनी चा एकमात्र फोन आहे, जो Google मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम च्या लेटेस्ट वर्जन वर चालत आहे.