Xiaomi ने आपल्या Xiaomi Redmi 4A आणि Xiaomi Redmi 4 स्मार्टफोन्स साठी MIUI 10 च्या स्टेबल अपडेट ची घोषणा केली आहे, हे दोन्ही फोन्स एंड्राइड 7.1.2 नॉगट वर आधारित आहेत.
Xiaomi ने आपल्या Xiaomi Redmi 4A आणि Xiaomi Redmi 4 स्मार्टफोन्स साठी MIUI 10 च्या स्टेबल अपडेट ची घोषणा केली आहे. Xiaomi Redmi 4A साठी आणण्यात आलेला हा अपडेट MIUI कम्युनिटी वर दिसला होता. तसेच तिथूनच असे समजले आहे कि अनेक यूजर्सच्या Redmi 4 फोन्सना हा अपडेट मिळायला सुरवात झाली आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोन्सना सिक्यूरिटी पॅच पण मिळण्याची शक्यता आहे.
जर तुम्हाला हा अपडेट आता पर्यंत मिळाला नसेल तर तुम्ही हा सेटिंगमध्ये जाकर अबाउट फोन, सिस्टम अपडेट वर जाऊन अपडेट चेक करू शकता. Xiaomi Redmi 4A मोबाईल फोन बद्दल बोलायचे झाले तर Xiaomi Redmi 4A मध्ये 5-इंचाच्या HD डिस्प्ले सोबत मेटल बॉडी डिजाइन देण्यात आली आहे. यात क्वाड-कोर स्नॅपड्रॅगॉन 425 प्रोसेसर आणि एड्रेनो 308 GPU आहे. यात 2GB/ 3GB चा रॅम आणि 16GB/ 32GB ची इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे. याच्या स्टोरेज बद्दल बोलायचे तर ती माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128GB पर्यंत वाढवता येते.
Xiaomi Redmi 4A मधील कॅमेरा सेटअप पाहता यात 13MP चा रियर कॅमेरा f/2.2 अपर्चर, HDR मोड आणि रियल टाइम सोबत देण्यात आला आहे. यात 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा पण आहे. Xiaomi Redmi 4A मध्ये 4G LTE चा सपोर्ट मिळतो. हा एंड्राइड 6.0 मार्शमॉलो ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित MIUI 8.0 वर चालतो.