मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी शाओमीने बाजारात आपला नवीन फोन रेडमी 3S लाँच केला आहे. हा स्मार्टफोन दोन व्हर्जनमध्ये सादर केला आहे. 2GB रॅम/16GB चे अंतर्गत स्टोरेज आणि 3GB रॅम/32GB चे अंतर्गत स्टोरेज. ह्याच्या 2GB व्हर्जनची किंमत CNY 699 (जवळपास ७००० रुपये) आहे आणि 3GB व्हर्जनची किंमत CNY 899 (जवळपास ९००० रुपये) ठेवण्यात आली आहे. सध्यातरी ह्या फोनला चीनमध्ये लाँच केले आहे. आणि 16 जूनपासून हा फोन चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
ह्या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 प्रोेसेसरने सुसज्ज आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. हा अॅनड्रॉईड लाॉलीपॉपवर आधारित MIUI 7 वर चालतो. ह्यात 4100mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्याला मेटल बॉडीसह लाँच केले गेले आहे आणि ह्यात एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा मिळत आहे.
हेदेखील पाहा – मोटो G4 प्लस रिव्ह्यू
ह्या स्टोरेजला 128GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. त्यासह LED फ्लॅशसुद्धा देण्यात आली आहे. ह्यात 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G, ब्लूटुथ, वायफाय, GPS आणि मायक्रो-USB 2.0 सारखे फिचर्स देण्यात आले आहे. ह्याचा आकार 139.3×69.6×8.5mm आणि वजन 144 ग्रॅम आहे. हा फोन डार्क ग्रे, सिल्वर आणि सोनेरी रंगात उपलब्ध होईल.
हेदेखील वाचा – जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘फ्रीडम 251’ २८ जूनपासून मिळणार
हेदेखील वाचा – मिजू M3S स्मार्टफोन लाँच. फिंगरप्रिंट स्कॅनरने सुसज्ज