मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी शाओमीन आपल्या टॅबलेट Mi पॅडच्या किंमतीमध्ये २००० रुपयाची घट केली आहे. भारतीय बाजारात आता हा टॅबलेट १०,९९९ रुपयात मिळेल, ह्याआधी ह्याची किंमत १२,९९९ रुपये होती.
आपल्या ट्विटमध्ये कंपनीने असे लिहिले आहे की, ‘आपल्या आवडीच्या Mi पॅडवर २०००रुपयाची घट करुन हा आपल्यासाठी १०,९९९ रुपयात उपलब्ध केला आहे.’ केवळ Mi डॉट कॉम आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.
जर शाओमी Mi पॅडच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 7.9 इंचाचा डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 2048×1536 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 3 ने संरक्षित आहे. ह्यात 2.2GHz एनवीडिया टेगरा K1 प्रोसेसर, 192-कोर केपलर GPU सुद्धा देण्यात आला आहे.
हा 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्यात 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ह्यात 6700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
फ्लिपकार्टवर 10999 रुपयांत खरेदी करा Xiaomi Mi pad