Xiaomi POCO F1 ची किंमत झाली कायमची कमी, जाणून घ्या नवीन किंमत

Xiaomi POCO F1 ची किंमत झाली कायमची कमी, जाणून घ्या नवीन किंमत
HIGHLIGHTS

Xiaomi Poco F1 मोबाईल फोनची किंमत कायमची Rs 1,000 ने भारतीय बाजारात कमी करण्यात आली आहे, हा मोबाईल फोन आता भारतात Rs 19,999 मध्ये विकत घेता येईल.

Xiaomi ने भारतात आपला सब ब्रँड POCO लॉन्च करून एक नवीन लढाई स्मार्टफोन बाजारात सुरु केली आहे. कंपनी ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपला POCO F1 मोबाईल फोन लॉन्च केला होता, आता समोर येत आहे की या डिवाइसची किंमत स्थायी स्वरूपात Rs 1,000 ने कमी केली आहे. या मोबाईल फोनची किंमत आधीपण कमी करण्यात आली होती पण ती कमी काळासाठी होती. आता तुम्ही POCO F1 स्मार्टफोन भारतात Rs 19,999 च्या बेस किंमतीत घेऊ शकता. तुम्ही हा मोबाईल फोन Flipkart आणि Mi.com व्यतिरिक्त Mi Homes वरून पण घेऊ शकता. 

नुकतीच बातमी आली होती की कंपनी ने आपला 7 लाख यूजर्सचा बेस भारतीय बाजारात बनवला आहे, हीच बाब सिलिब्रेट करण्यासाठी कंपनी ने आपल्या POCO F1 मोबाईल फोनची किंमत Rs 1,000 ने कमी केली आहे. 

POCO F1 मोबाईल फोन बद्दल बोलायचे झाले तर हा भारतीय बाजारात 4 वेगवेगळ्या वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला होता, हा मोबाईल फोन 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्यतिरिक्त 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज, 6GB रॅम 128GB स्टोरेज आणि अजून एक मॉडेल 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह Armoured Edition म्हणून लॉन्च केला होता.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo