144Hz डिस्प्ले आणि 120W फास्ट चार्जिंगसह येईल Xiaomi Pad 6 सिरीज, वाचा डिटेल्स

Updated on 01-Jun-2022
HIGHLIGHTS

Xiaomi टॅबलेटची नेक्स्ट जनरेशन लवकरच बाजारात येण्याची शक्यता.

अगदी किफायतशीर दरात येणार टॅबलेट.

144Hz डिस्प्ले आणि 120W फास्ट चार्जिंगसह अनेक जबरदस्त फीचर्स.

टेक्नोओलॉजी कंपनी Xiaomi ने गेल्या वर्षी अनेक मार्केटमध्ये Mi Pad 5 लाँच केला होता, ज्याला Xiaomi Pad 5 म्हणूनही ओळखले जाते. या टॅबलेटच्या किमती वेगवेगळ्या आहेत आणि मिड रेंज फीचर्ससह 120Hz डिस्प्ले सारखे स्पेसिफिकेशन्स देखील दिले गेले आहेत. त्यानंतर आता कंपनी  Xiaomi पॅड 6 सीरीजवर काम करत आहे, असे सांगितले जात आहे. EEC लिस्टिंगनंतर हे स्पष्ट झाले आहे की, कंपनी Xiaomi Pad 6 सिरीज नवीन टॅबलेटवर काम करत आहे. चला तर जाणून घेऊयात या टॅबलेटचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स… 

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स:

91mobiles ने नुकत्याच दिलेल्या अहवालात नेक्स्ट जनरेशनसाठी 4 टॅबलेट सादर करण्यात येणार आहेत, असे समोर आले आहे. अहवालानुसार, या टॅबलेटमध्ये 4 मॉडेल नंबर L81, L81A, L82, आणि L83 असतील, जे Xiaomi Pad 6, Pad 6 Pro, Pad 6 Pro 5G आणि Redmi टॅबलेट असे असतील. पॅड 6 सिरीजमध्ये मिड-रेंज ते फ्लॅगशिप सेगमेंटवर लक्ष दिले जाणार आहे. तर कंपनी किफायतशीर दरात रेडमी टॅबलेट आणणार आहे, असे समोर आले आहे. 
 

हे सुद्धा वाचा: 'या' ५ ऍप्सवर अगदी मोफतमध्ये बघा मुव्ही आणि वेब सिरीज, जाणून घ्या सविस्तर

रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, हे टॅबलेट MediaTek आणि Qualcomm या दोन्ही प्रोसेसर व्हेरियंटमध्ये उपलब्ध असतील. मात्र, टॅबलेटच्या उपलब्धतेबाबत अद्याप काही स्पष्ट झालेले नाही. Xiaomi Pad 6 Pro 5G चे टॉप-एंड मॉडेल Snapdragon 8+ Gen 1 आणि Dimensity 9000 SoC सह येण्याची शक्यता आहे.
 

याशिवाय, पॅड 6 सिरीजमध्ये, 144Hz LTPO डिस्प्ले, पावरफुल स्पीकर आणि टॅबलेटसाठी MIUI ची नवीन आवृत्ती देखील येण्याची अपेक्षा आहे. अलीकडील अहवालामध्ये असे समोर आले आहे की, Xiaomi टॅबलेटची नेक्स्ट जनरेशन ऑगस्ट 2022 मध्ये येण्याची अपेक्षा आहे.

Xiaomi Mi Pad 5 टॅबलेटचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

 Xiaomi Mi Pad 5 टॅबलेट हे ऍप्स आणि गेम सहजतेने वापरण्यासाठी योग्य डिवाइस आहे. टॅबलेटमध्ये 11 इंच लांबीची टचस्क्रीन आहे. हे टॅबलेट रोजच्या वापरासाठी योग्य आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, 6 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेजसह Qualcomm Snapdragon 860 SoC आहे. Mi Pad 5 च्या मागील बाजूस, LED फ्लॅशसह 13-मेगापिक्सेल कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे. Mi Pad 5 च्या 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत  22,900 रुपये आहे, तर 6 GB RAM आणि 256 GB वेरिएंटची किंमत 26,400 रुपये आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :