Xiaomi ने अखेर स्मार्टफोन्सच्या Xiaomi 12S लाइनअपची लाँच डेट कन्फर्म केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून लीक आणि अफवांचा एक भाग असलेल्या Xiaomi 12S सिरीजमध्ये Xiaomi 12S, Xiaomi 12S Pro आणि Xiaomi 12S अल्ट्रा स्मार्टफोनचा समावेश असेल. या ब्रँडने तिन्ही Xiaomi 12S स्मार्टफोन्सचे डिझाइन देखील टीज केले आहेत. चला तर जाणून घेऊयात फोनबाबत सविस्तर माहिती…
हे सुद्धा वाचा : मस्तच ! टाईप न करता WhatsAppवर मॅसेज पाठवा, चला तुम्ही देखील लगेच ट्राय करून बघा
Xiaomi 12S सिरीज स्मार्टफोन 4 जुलै 2022 रोजी चीनमध्ये लाँच केले जातील. ब्रँडने अद्याप सीरिजच्या जागतिक लॉन्चबद्दल कोणतेही तपशील उघड केलेले नाहीत. Xiaomi 12S हा एक कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोन आहे, तर टॉप-ऑफ-द-लाइन Xiaomi 12S Ultra ला सर्वात जास्त फीचर्सने भरपूर असलेला Xiaomi स्मार्टफोन म्हटले गेले आहे. तिन्ही स्मार्टफोन नवीनतम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेटने सुसज्ज असतील. Xiaomi ची Leica भागीदारीची देखील आता पुष्टी झाली आहे, ज्यामुळे हे कन्फर्म होते की, फोन उत्कृष्ट फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचा अनुभव देणार आहे.
Xiaomi 12S मध्ये 6.81-इंच FHD+ 120Hz रिफ्रेश रेट AMOLED पॅनेल असण्याची अपेक्षा आहे. Xiaomi 12S च्या पॉवरिंगसाठी स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर असेल, जे 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह जोडलेले असेल. Xiaomi 12S सिरीज फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 50MP मेन कॅमेरा, 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 5MP चा तिसरा कॅमेरा समाविष्ट आहे. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी असेल, जी USB Type-C चार्जिंग पोर्टवर 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.