श्याओमी MIUI 7 यूजर इंटरफेस २७ ऑक्टोबरपासून होणार रोलआऊट

Updated on 23-Oct-2015
HIGHLIGHTS

ह्या नवीन यूजर इंटरफेसमध्ये ग्राहकांना उत्कृष्ट बॅटरी मॅनेजमेंट आणि नवीन कस्टमायझेशन थीम मिळेल. ह्या यूजर इंटरफेसमध्ये रोझ, पिंक, ब्लश, आणि ओशियन ब्रीजसह ४ प्रकारांचा समावेश आहे.

मोबाईल निर्माता कंपनी श्याओमी आपले नवीन यूजर इंटरफेस MIUI 7ला भारतात २७ ऑक्टोबरपासून रोलआऊट करेल. कंपनीने ह्यासंबंधी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या नवीन युजर इंटरफेसला हल्लीच काही काळापूर्वी लाँच केले होते. त्यावेळी कंपनीचा हा युआय बीटा संस्करणमध्ये उपलब्ध होता.

 

यूजर इंटरफेस MIUI7 चे वैशिष्ट्य म्हणजे, हा अॅनड्रॉईड सिस्टम ५.१ लॉलीपॉपवर आधारित आहे. हा यूजर इंटरफेस रेडमी 1S, रेडमी 2, Mi3, Mi4, Mi4i, रेडमी नोट आणि रेडमी नोट 4G ला सपोर्ट करतो.

MIUI 7 मागील MIUI चा अपेक्षा प्रतिसाद वेळ आणि डेटा लोडिंग वेळ ३० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्याशिवाय ह्या नवीन यूजर इंटरफेसमध्ये SMSफिल्टर दिला गेला आहे जो आपल्याला ह्या गोष्टीबाबत माहिती देतो की येणारा संदेश आपल्या संपर्क यादीत समाविष्ट नाही आहे.

ह्या नवीन यूजर इंटरफेसमध्ये ग्राहकांना उत्कृष्ट बॅटरी मॅनेजमेंट आणि नवीन कस्टमायझेशन थीम मिळेल. ह्या यूजर इंटरफेसमध्ये रोझ, पिंक, ब्लश, आणि ओशियन ब्रीजसह ४ प्रकारांचा समावेश आहे. ह्यापैकी कशाचीही निवड केली जाऊ शकते. ह्या नवीन थीममध्ये लॉक स्क्रीन असतानासुद्धा गेम खेळू शकता. तेच लॉक स्क्रीन वैशिष्ट्याद्वारे दररोज लॉक स्क्रीन वॉलपेपरसुद्धा बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे.

MIUI 7 मध्ये बॅटरी बॅकअप पहिल्यापेक्षा खूप चांगली आहे. कंपनीनुसार दररोज वापर केल्यास बॅटरीमध्ये १० टक्क्यांनी वाढ होईल. त्याच ग्राहकांना ३ तासांपेक्षा जास्त बॅटरी बॅकअप प्राप्त होईल.

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :