रेडमी 2 आणि रेडमी 2 प्राईंम स्मार्टफोनसाठी Mi प्रोटेक्ट प्लान २७५ रुपयांत उपलब्ध होईल. तर Mi 4 16GB, Mi 4i 16GB आणि Mi पॅड सह ह्या प्लानला घेण्यासाठी ४९९ रुपये मोजावे लागतील.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी श्याओमीने भारतात आपली नवीन सेवा श्याओमी Mi प्रोटेक्ट इंश्युरन्स सर्विसेस लाँच केली आहे. कंपनीने आपल्या स्मार्टफोन आणि टॅबलेटसाठी Mi प्रोटेक्ट इंश्युरन्स सर्विसेस लाँच केली आहे. ह्या सेवेचा लाभ Mi.com वेबसाइटवरुन खरेदी केलेल्या प्रोडक्टसह घेता येईल. ज्या लोकांजवळ आधीपासून श्याओमीचे स्मार्टफोन किंवा टॅबलेट असतील, ते ह्या प्लानला वेगळे खरेदी करु शकत नाही.
श्याओमी Mi प्रोटेक्ट इंश्युरन्स सर्विसेसच्या अंतर्गत एक्सिडेंट आणि लिक्विड डॅमेज कव्हर होईल. ह्या Mi प्रोटेक्ट प्लानला ऑनलाईन Mi.com वरुन Mi डिवाईससह खरेदी करता येईल. त्याचबरोबर Mi प्रोटेक्ट युजरला स्मार्टफोन दुरुस्त करण्यासाठी मोफत पिक अँड ड्रॉप सर्विसेससुद्धा मिळेल. यूजरला एक्टिवेशनसाठी एका वर्षाच्या आता दूसरी सेवा मोफत मिळेल.
मिळालेल्या माहितीनुसार, रेडमी 2 आणि रेडमी 2 प्राईम स्मार्टफोनसाठी Mi प्रोटेक्ट प्लान २७५ रुपयांत उपलब्ध होईल. तर Mi 4 16GB, Mi 4i 16GB आणि Mi पॅड सह ह्या प्लानला घेण्यासाठी ४९९ रुपये मोजावे लागतील.
त्याशिवाय Mi प्रोटेक्ट इंश्युरन्स सर्विसच्या मदतीने यूजर डिवाईस चोरी झाल्यास सिमकार्ड जगातून कुठेही ब्लॉक करु शकतो. ह्या सेवेमध्ये सिमच्या चुकीच्या वापरावर ३००० रुपये कव्हर केले जातील. डिवाईसचे नुकसान झाल्यास यूजर एमआय प्रोटेक्ट सर्विसेसचा फायदा घेण्यासाठी १८०० ४०७ ३३३३३३/१८०० १२३३३३०/८०८० ३३३३३३ वर कॉल करावा लागेल.