Xiaomi Mi Mix 3 स्मार्टफोन बद्दल आधी पण बातमी आली आहे की हा 15 सप्टेंबरला लॉन्च केला जाऊ शकतो, याचा अर्थ असा की येत्या काही दिवसांत हा डिवाइस लॉन्च होईल.
ऑल स्क्रीन सह स्मार्टफोन्स लॉन्च करणे ही सध्या सर्व कंपन्यांसाठी एक प्राथमिकता बनली आहे, त्यामुळेच आपण फिंगरप्रिंट सेंसर मागे जाताना पहिला आहे आणि कॅमेरा मध्ये एक बदल जो आजकाल समोर आला आहे तो आहे स्लाइड आउट कॅमेर्याचा ट्रेंड. हा ट्रेंड आता जोर धरू लागला आहे. आपण Vivo च्या NEX स्मार्टफोन मध्ये ही टेक्नोलॉजी बघितली आहे. तसेच Oppo च्या Find X स्मार्टफोन मध्ये पण असेच काहीसे बघितले होते. आता असे वाटते आहे की इतर कंपन्या पण याचे दिशेने वाटचाल करत आहेत.
जर आपण सध्या चालू असलेल्या IFA 2018 बद्दल बोलायचे झाले तर त्यात Honor ने आपला एक स्मार्टफोन Magic 2 टीज केला आहे, जो अशाप्रकारच्या कॅमेरा सह येणार आहे. तसेच Xiaomi पण याच दिशेने जाण्याचा विचार करत आहे. असे बोलले जात आहे की Xiaomi आपला आगामी डिवाइस Xiaomi Mi MIX 3 याच टेक्नोलॉजी सह लॉन्च करू शकते.