शाओमी ने आता एक टीजर वीडियो शेयर केला आहे ज्यातून ही माहिती मिळाली आहे.
Xiaomi Mi Mix 2s च्या बाबतीत आता पर्यंत अनेक लीक समोर आले आहेत. या लीक्स मधुन या फोन बद्दल खुप माहिती मिळाली आहे. आता शाओमी च्या आगामी फ्लॅगशिप Mi Mix 2s बद्दल कंपनी ने एक टीजर शेयर केला आहे. शाओमी ने या वीडियोला चीनच्या वीडियो शेयरिंग वेबसाइट Miaopai.com वर शेयर केले आहे. या वीडियो मधुन सांगण्यात आले आहे की, हा फोन 27 मार्चला लॉन्च होईल. Xiaomi Mi Mix 2s च्या लॉन्च सह कदाचित कंपनी यात एका LCD पॅनल च्या जागी एक OLED पॅनल देऊ शकते. काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट नुसार, सॅमसंग या फोन साठी OLED पॅनल सप्लाई करेल. Xiaomi Mi Mix 2s कंपनी चा पहिला फोन असेल ज्यात स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असेल. काही दिवसांपूर्वी से सॅमसंग ने S9 आणि S9+ ला या नव्या चिपसेट सह लॉन्च केले होते.