या फोन मध्ये स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आणि 8GB चा रॅम असेल. तसेच फोनच्या मागच्या बाजूस डुअल कॅमेरा सेटअप असणार आहे.
Xiaomi Mi Mix 2S चा एक टीजर वेइबो वर पोस्ट करण्यात आला होता, जो बघून वाटतय की फोन मध्ये 6-इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच या फोन मध्ये स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आणि 8GB रॅम आहे. यासोबतच फोनच्या मागच्या बाजूस डुअल कॅमेरा सेटअप असणार आहे. आता या फोनच्या फर्मवेयर फाइल लीक झाली आहे, ज्यामुळे याच्या स्पेक्स ची माहिती मिळत आहे. या फोनच्या कॅमेरा मध्ये सोनी IMX363 सेंसर आहे. पहिल्यांदाच Mi Mix सीरीज च्या फोन मध्ये डुअल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. सोबतच फोन मध्ये AI फीचर पण आहे. हा फोन 18:9 आस्पेक्ट रेश्यो डिस्प्ले सह येईल. तसेच यात एंड्राइड ओरियो मिळण्याची शक्यता आहे. यात 3400mAh ची बॅटरी पण असू शकते.