शाओमी ने सॅमसंग कडे 6.01 इंचाच्या OLED डिस्प्ले ची ऑर्डर दिली आहे.
वेब वर आलेल्या नव्या रिपोर्ट्स नुसार शाओमी Mi Mix 2S आणि Mi 7 दोन्ही मध्ये 6.01 इंचाच्या OLED डिस्प्ले चा वापर केला जाऊ शकतो. कंपनी ने सॅमसंग कडून हे OLED डिस्प्ले ऑर्डर केले आहेत.
Weibo वर आलेल्या लीक नुसार दोन्ही कंपन्यांमध्ये मागच्या वर्षी एक डील झाली आहे आणि सॅमसंग ने डिसेंबर च्या आसपास पहिली ऑर्डर वितरित केली आहे. शाओमी ला डिसेंबर मध्ये 11 लाख डिस्प्ले मिळवले आणि उर्वरित 22 लाख यूनिट्स ची डिलीवरी जानेवारी मध्ये करण्यात आली.
Mi Mix 2S मागच्या वर्षीच्या Mi Mix चा एक नवीन वर्जन असेल आणि हा डिवाइस बेजल लेस डिस्प्ले सह येण्याची शक्यता आहे, तसेच Mi 7 मध्ये 18: 9 डिस्प्ले मिळू शकतो.
सध्य Mi Mix 2, एका LCD पॅनल चा वापर करतो आणि आता Mi Mix 2S मध्ये OLED पॅनल चा वापर एक अपडेट असेल. तसेच दुसरीकडे अशी अफवा आहे की Mi 7 मध्ये 6.01 इंचाचा OLED डिस्प्ले असेल. दोन्ही फोंस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 एसओसी वर चालतील. आशा आहे की दोन्ही फोंस मध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असेल.
आधी आलेल्या रिपोर्ट्स नुसार Xiaomi Mi 7 मध्ये f/1.7 अपर्चर आणि 4X ऑप्टिकल झुम सह 19MP चा डुअल रियर कॅमेरा असेल. दुसरीकडे, Xiaomi Mi Mix 2S हा 16MP च्या रियर कॅमेरा सह येण्याची अफवा पण आलेली. Mi 7 मध्ये 3350mAh आणि Mi Mix 2S मध्ये 4400mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे.