Xiaomi Mi MIX 2s ला मिळाला एंड्राइड पाई चा बीटा अपडेट

Xiaomi Mi MIX 2s ला मिळाला एंड्राइड पाई चा बीटा अपडेट
HIGHLIGHTS

Xiaomi Mi MIX 2s आधी एंड्राइड ओरियो सह लॉन्च करण्यात आला आहे.

Xiaomi ने Mi Mix 2s स्मार्टफोन यावर्षीच्या सुरवातीला बेजल-लेस डिजाइन आणि इम्प्रूव्ड फीचर्स सह सादर केला होता. हा स्मार्टफोन आधी एंड्राइड ओरियो सह लॉन्च करण्यात आला होता आणि आता डिवाइस लेटेस्ट (बीटा) एंड्राइड पाई अपडेट देण्यात आला आहे. 

XDA Developers नुसार, एंड्राइड पाई चा चीनी आणि ग्लोबल बीटा ROM आता Mi MIX 2s साठी उपलब्ध झाला आहे. या अपडेट मध्ये सप्टेंबर महिन्यासाठी आलेला सिक्योरिटी पॅच पण आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही रिकवरी ROMs आहेत, त्यामुळे हे कस्टम रिकवरी म्हणजे TWRP ने फ्लॅश करता येईल. 

या फोन च्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 SoC वर चालतो आणि याचा फ्रंट फेसिंग कॅमेरा नॉच मध्ये आहे. ज्याचा अंदाज आधी पासून लावण्यात आला होता. Mi Mix 2S स्मार्टफोन च्या रियर पॅनल वर कर्व्ड सिरेमिक बॉडी आहे, ज्यामुळे वायरलेस चार्जिंग मिळते. हा फोन ब्लॅक आणि व्हाइट कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होईल. 

हा फोन एड्रीनो 630 GPU सह 2.8GHz क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो. डिवाइस च्या फ्रंट बद्दल बोलायचे तर यात बारीक बेजल्स सह 5.99 इंचाचा डिस्प्ले आहे. वरच्या बाजूला आणि साइडला बारीक बेजल्स आहेत. पण खालच्या बाजूच्या बेजल्स मध्ये Mi Mix 2 प्रमाणे फ्रंट फेसिंग कॅमेरा असेल. या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, 12MP ची वाइड एंगल लेंस आणि 12MP ची टेलीफोटो लेंस. फोन ची बॅटरी 3400 एमएएच ची आहे आणि हा एंड्रॉयड ओरियो वर आधारित MIUI 9 वर चालतो. 

Mi Mix 2S मध्ये इतर 18:9 शाओमी डिवाइसेस प्रमाणे ऑनस्क्रीन नेविगेशन बटन आहेत. या फोन मध्ये IR ब्लास्टर फीचर पण आहे, जो एक उपयोगी फीचर आहे पण कित्येक फ्लॅगशिप डिवाइसेस मध्ये कधीच मिळत नाही. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo