शाओमी Mi मॅक्स स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरु

शाओमी Mi मॅक्स स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरु
HIGHLIGHTS

स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या 3GB रॅम व्हर्जनची किंमत १४,९९९ रुपये आहे. तर स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या 4GB व्हर्जनची किंमत १९,९९९ रुपये आहे.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी शाओमीने आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन Mi मॅक्स लाँच केला आहे. भारतात ह्या स्मार्टफोनची किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरु होते. डिस्प्लेच्या बाबतीत हा कंपनीचा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा स्मार्टफोन आहे. हा दोन व्हर्जनमध्ये लाँच केला गेला आहे. स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसर, 3GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज आणि दुस-या व्हर्जनमध्ये स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर, 4GB रॅम आणि 128GB चे अंतर्गत स्टोरेज आहे. स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या 3GB रॅम व्हर्जनची किंमत १४,९९९ रुपये आहे. तर स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या 4GB व्हर्जनची किंमत १९,९९९ रुपये आहे. ह्या फोनचा पहिला फ्लॅश सेल ६ जुलैला Mi.com वर आयोजित करण्यात आला आहे. हा फोन १३ जुलैपासून ओपन सेलमध्ये उपलब्ध होईल.

शाओमी Mi मॅक्समध्ये 6.44 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. हा 4850mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा फेज डिटेक्शन ऑटोफोकससह देण्यात आला आहे. फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. हा फोन अॅनड्रॉईड मार्शमॅलोवर आधारित आहे. ह्यात फिंगरप्रिंट सेंसर मागील बाजूस दिले आहे. हा सिल्वर, गोल्ड आणि डार्क ग्रे रंगात उपलब्ध होईल.

हेदेखील वाचा – उत्कृष्ट मेटल बॉडीसह येणारे हे आकर्षक स्मार्टफोन्स आता भारतातही झाले उपलब्ध…

त्याचबरोबर शाओमीने MIUI 8 ला सुद्धा लाँच केले आहे. ह्यात व्हिडियो एडिटिंग टूल्स मिळत आहे. ज्याद्वारे यूजर व्हिडियोला कापू शकतो. तसेच ह्यात फिल्टरसुद्धा टाकू शकता.

हेदेखील वाचा – आता लकी ड्रॉ ठरविणार कोणाला मिळणार फ्रीडम 251 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – HP ने लाँच केला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त लॅपटॉप क्रोमबुक 11G5

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo