Xiaomi Mi Max 3 स्मार्टफोन या वर्षी जुलै मध्ये केला जाऊ शकतो लॉन्च: Xiaomi CEO
Xiaomi या महिन्यात 31 मे ला चीन मध्ये आपला एक इवेंट आयोजित करणार आहे, ज्यात कंपनी आपले अनेक प्रोडक्ट्स लॉन्च करू शकते.
Xiaomi ने आधीच हे स्पष्ट केले आहे की ते चीन मध्ये 31 मे ला आपल्या एका इवेंट चे आयोजन करणार आहे, या इवेंट मध्ये कंपनी कडून अनेक प्रोडक्ट्स लॉन्च केले जाऊ शकतात. पण
कंपनी ने अजूनपर्यंत याबद्दल माहिती दिली नाही की या इवेंट मध्ये कोणते प्रोडक्ट्स लॉन्च केले जातील.
पण अनेक रिपोर्ट्स चे म्हणणे आहे की कंपनी आपल्या या इवेंट मध्ये यावर्षीचा आपला पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi Mi 7 लॉन्च करू शकते, त्याचबरोबर असे पण समोर येत आहे की या डिवाइस व्यतिरिक्त कंपनी आपला Mi 8 स्पेशल एडिशन पण कंपनी या इवेंट मध्ये लॉन्च करू शकते, हा कंपनी कडून त्यांच्या 8th एनिवर्सरी निमित्ताने लॉन्च केला जाईल. हा डिवाइस Mi Community Forum सोबत Mi Store वर पण चीन मध्ये दिसला आहे. त्याचबरोबर कंपनी आपल्या या इवेंट मध्ये Mi Band 3 पण लॉन्च करू शकते.
तसेच असे पण समोर येत आहे की कंपनी कडून या इवेंट मध्ये आपला Mi Max 3 डिवाइस पण कंपनी सादर करू शकते. विशेष म्हणजे कंपनी ने मे महिन्यात Xiaomi Mi Max 2 डिवाइस लॉन्च केला होता, पण Xiaomi चे CEO Lei Jun म्हणणे आहे की हा का डिवाइस जुलै महिन्यात लॉन्च केला जाऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी Xiaomi Mi Max 3 डिवाइस चा एक लीक समोर आला होता, ज्यात याच्या केस बद्दल माहिती मिळाली होती. हा लीक केस बद्दल बोलायचे तर हा पाहून असे वाटते की या स्मार्टफोन मध्ये आधीच्या डिवाइस प्रमाणे एक फिंगरप्रिंट सेंसर फोन च्या रियर पॅनल वर असेल. त्याचबरोबर यातून समोर येत आहे की फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप असेल जो वर्टीकल पोजीशन मध्ये असेल. LED फ्लॅश या सेटअप च्या मध्ये ठेवण्यात आला आहे.
या केस लीक वरून स्मार्टफोन मध्ये एक 3.5mm चा ऑडियो जॅक असल्याचे समोर आले आहे. तसेच स्पीकर्स ग्रिल च्या मध्ये एक USB type C पोर्ट असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आधी आलेल्या लीक मधून असे समजले होते की या डिवाइस मध्ये वायरलेस चार्जिंग पण असू शकते.
फोन च्या काही स्पेक्स पाहता या स्मार्टफोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप असणार आहे, त्याचबरोबर यात एक 6.99-इंचाचा FHD+ डिस्प्ले फुल-स्क्रीन सह असू शकतो. तसेच यात एक 5,000mAh क्षमता असलेली बॅटरी असण्याची शक्यता आहे. जी क्विक चार्ज 3.0 सह येईल.
फोन दोन वेगवेगळ्या वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. एक मॉडेल मध्ये 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह स्नॅपड्रॅगन 636 सह येऊ शकतो, त्याचबरोबर दुसरा मॉडेल 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह लॉन्च केला जाऊ शकतो.
नोट: फीचर्ड इमेज काल्पनिक आहे.