Xiaomi Mi Max 3 चा अधिकृत रेंडर लीक, लॉन्च च्या आधी समोर आले स्पेसिफिकेशन

Xiaomi Mi Max 3 चा अधिकृत रेंडर लीक, लॉन्च च्या आधी समोर आले स्पेसिफिकेशन
HIGHLIGHTS

XIaomi Mi Max 3 स्मार्टफोन बद्दल लीक झालेली ही माहिती कंपनी च्या एका अधिकाऱ्याकडून समोर आली आहे.

Xiaomi Mi Max 3 Official Render Leak on Weibo Ahead of Launch: Xiaomi Mi Max 3 स्मार्टफोन लॉन्च साठी फक्त थोडाच वेळ उरला आहे आणि याच्या लॉन्च च्या आधी असे काहीच समोर आले नाही, ज्या बद्दल आपल्याला माहिती नाही. या डिवाइस बद्दल आता पर्यंत अनेकदा माहिती समोर आली आहे. पण आता नवीन माहिती समोर आली आहे म्हणजे Xiaomi च्या अधिकार्‍यानेच या डिवाइस बद्दल भरपूर माहिती समोर ठेवली आहे. 

Xiaomi चे फाउंडर Bin Lin ने Xiaomi Mi Max 3 स्मार्टफोन बद्दल वेइबो वर एक पोस्ट करून माहिती दिली आहे. या लीक मध्ये स्मार्टफोन सर्व अँगल मधून दिसत आहे. पण सर्व माहिती तीच आहे जी तुम्हाला याआधी मिळाली आहे. परंतु या लीक मधून समोर आले आहे की हा डिवाइस अनेक रंगांमध्ये उपलब्ध करण्यात येईल, याचा अर्थ असा की हा डिवाइस तुम्ही ब्लू, ब्लॅक आणि गोल्ड कलर ऑप्शन्स मध्ये विकत घेता येईल. 

कंपनी चे फाउंडर ने आज एक नवीन पोस्टर वेइबो वर पोस्ट केला आहे, या पोस्टर वरून स्मार्टफोन चे काही स्पेसिफिकेशन्स समोर येत आहेत. तसेच या लीक वरून या डिवाइस च्या किंमतीची हिंट मिळत आहे. पण याचे स्पेसिफिकेशन तसेच आहेत, जसे आपण आधी आलेल्या अनेक लीक मध्ये बघितले आहेत.  

या डिवाइस बद्दल आधी पण माहिती समोर आली आहे. या माहिती नुसार, हा डिवाइस कंपनी कडून एका 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या स्क्रीन सह लॉन्च केला जाणार आहे. त्यामुळे याचा डिस्प्ले अजूनच मोठा असेल. तसेच या लिस्टिंग वरून समोर येत आहे की या डिवाइस मध्ये तुम्हाला 6.99-इंचाचा एक FHD+ डिस्प्ले मिळणार आहे. हा डिवाइस मागून बघितल्यास हा Xiaomi Mi 6X चा एक नवीन वर्जन दिसत आहे किंवा मग आपण असे म्हणू की हा याचा मोठा वर्जन वाटतो. 

फोन मधील अन्य स्पेक्स बद्दल बोलायचे तर हा डिवाइस एका ड्यूल कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाणार आहे. तसेच हा दिसायला काहीसा काही वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या Xiaomi Redmi Note 5 Pro, Mi 6X, Mi 8 आणि अन्य स्मार्टफोंस सारखा दिसतो. फोन मध्ये तुम्हाला एक 1.8GHz चा प्रोसेसर मिळणार आहे, तसेच यात 6GB च्या रॅम सह 128GB ची इंटरनल स्टोरेज असू शकते. या लिस्टिंग मधून हे सर्व समोर येत आहे. 

फोन मधील ड्यूल कॅमेरा पाहता हा Xiaomi Redmi Note 5 Pro प्रमाणे 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या सेंसर सह येऊ शकतो. त्याचबरोबर यात एक 5400mAh क्षमता असलेली बॅटरी पण असेल. या डिवाइस बद्दल असे पण समोर येत आहे की हा आधी चीन मध्ये लॉन्च केला जाईल, त्यानंतर भारतात पण लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo