जुलै मध्ये लॉन्च होऊ शकतो Xiaomi Mi Max 2 स्मार्टफोन, मिळाले 3C सर्टिफिकेशन
Mi Max 3 मध्ये 7 इंचाचा फुल HD+ रेजोल्यूशन वाला डिस्प्ले असू शकतो ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 असेल.
तुम्हाला तर माहितीच आहे की Xiaomi Mi Max 2 ची जागा घेण्यासाठी नवीन जनरेशन चा डिवाइस लॉन्च करेल आणि कंपनी ने स्पष्ट पण केले होते की Mi Max 3 यावर्षी जुलै मध्ये लॉन्च केला जाईल. आता या स्मार्टफोन ला 3C सर्टिफिकेशन मिळाले आहे त्यामुळे अशा आहे की या डिवाइस चा लॉन्च आता जास्त दूर नाही. एक Xiaomi स्मार्टफोन मॉडेल नंबर M1807E8S सह 3C सर्टिफिकेशन साइट वर दिसला होता आणि हा फोन 5VDC 3A/9VDC 2A/12VDC 1.5A, 18W पर्यंतच्या फास्ट चार्जिंग सह येतो. याचा अर्थ असा की हा फोन पण Mi Max 2 प्रमाणे फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करेल.
मागच्या महिन्यात Xiaomi च्या CEO Lei Jun ने एका Weibo पोस्ट मध्ये स्पष्ट केले होते की Mi Max 3 या वर्षी जुलै मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. पण, त्यांनी डिवाइस ची कोणतीही इतर माहिती शेअर केली नाही. लक्षात असू द्या, Mi Max 2 मे 2017 मध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि भारतात हा डिवाइस जुलै 2017 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. Xiaomi Mi Max आणि Max 2 कंपनी चे यशस्वी डिवाइस आहेत.
रुमर्स वर विश्वास ठेवल्यास Xiaomi Mi Max 3 मध्ये एका मिड-रेंज स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशंस असतील. Mi Max 3 मध्ये 7 इंचाचा फुल HD+ रेजोल्यूशन वाला डिस्प्ले असू शकतो ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 असेल. अजून नॉच डिस्प्ले बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही पण स्मार्टफोन Mi Max 3 च्या डिस्प्ले वर नॉच दिली जाऊ शकते.
मागील लॉन्च पाहता बोलू शकतो की डिवाइस मध्ये Redmi Note 5 Pro प्रमाणे स्नॅपड्रॅगन 636 SoC असेल. Xiaomi ने Mi Max 2 आणि Redmi Note 4 ला स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट सह सादर केले होते. त्याचप्रमाणे Mi Max आणि Redmi Note 3 हे डिवाइस पण कंपनी ने स्नॅपड्रॅगन 650 SoC सह लॉन्च केले होते. Mi Max 3 पॉवर-एफिशिएन्ट स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट सह लॉन्च केला जाऊ शकतो. पण हे फक्त अंदाज आहेत डिवाइस चा बेंचमार्क रिपोर्ट समोर आल्यानंतर प्रोसेसर चा खुलासा होऊ शकतो.
फोन मध्ये 5500mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे जी फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करेल. डिवाइस च्या बॅक वर दोन कॅमेरा दिले जाऊ शकतात जसे आपण Note 5 Pro आणि Redmi Y2 मध्ये बघितले होते. हा डिवाइस आधी चीन मध्ये MIUI 10 सह सादर केला जाऊ शकतो. Xiaomi हा डिवाइस ऑगस्ट मध्ये भारतात लॉन्च करू शकते, पण हे अजून स्पष्ट झाले नाही. तसेच डिवाइस ला TENAA सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर याचे संपूर्ण स्पेसिफिकेशंस आणि फोटो समोर येऊ शकतात.