Xiaomi ने शेवटी, Mi LED स्मार्ट TV 4 सह आपल्या स्मार्ट टीवी पोर्टफोलियो ला भारतात आणले आहे. पहिल्यांदाच शाओमी ने भारतात टेलिविजन लाँच केला आहे.
Mi LED स्मार्ट TV 4 सह कंपनी त्यांना टारगेट करू इच्छिते, जे किंमत न बघता, क्वालिटी 4K HDR TV विकत घेऊ इच्छितात. Mi LED स्मार्ट TV 4 ची किंमत 39,999 रुपये आहे आणि हा अल्ट्रा स्लीम फॉर्म फॅक्टर सह येतो.
55 इंचाचा हा टीवी 4K HDR डिस्प्ले सह येतो. यूजर्सना एक Mi IR केबल पण यासोबत फ्री मिळेल. तसेच फ्री ऑनसाइट इस्टॉलेशन सोबत हंगामा प्ले आणि सोनी लिव चं 3 महिन्याचं फ्री सब्सक्रिप्शन पण मिळेल.
Mi LED स्मार्ट TV 4 एंड्रॉयड वर आधारित शाओमी च्या पॅचवॉल ओएस वर चालतो पण हा गूगल प्ले स्टोर ला सपोर्ट नाही करत. Mi LED स्मार्ट TV 4 वर 15 भारतीय भाषांमध्ये कंटेन्ट उपलब्ध होईल. Mi LED स्मार्ट TV 4 फक्त फ्लिपकार्ट, Mi.कॉम, Mi होम्स वर उपलब्ध होईल आणि फर्स्ट सेल 22 फेब्रुवारीला सुरू होईल.
Mi LED स्मार्ट TV 4 चे स्पेक्स
55 इंचाचा हा Mi LED स्मार्ट TV 4 4.9mm इतका बारीक आणि लाइट डिजाइन वाला आहे, हा 4K आणि HDR ला सपोर्ट करतो, हा टीवी शाओमी च्या पॅचवॉल ओएस वर चालतो. यात 2GB रॅम आणि 8GB स्टोरेज आहे.
कनेक्टिविटी साठी टीवी डुअल बँड वाई-फाई आणि ब्लूटूथ 4.0 चा वापर करतो. हा TV 3 HDMI पोर्ट्स, 1 ARC, 1 USB 3.0 पोर्ट आणि 1 USB 2.0 पोर्ट ऑफर करतो. प्रॉसेसिंग यूनिट साठी Mi TV 4 माली T830 ग्राफिक्स सह एमलॉजिक 64 बिट क्वॉड कोर CPU चा वापर करतो. साउंड डिपार्टमेंट मध्ये Mi TV 4 Dolby+DTS सिनेमा ऑडियो क्वालिटी देतो.