XIAOMI MI A3 आणि MI A3 LITE मोबाईल फोन्स येऊ शकतात स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीज सह

XIAOMI MI A3 आणि MI A3 LITE मोबाईल फोन्स येऊ शकतात स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीज सह

आपण काही दिवसांपूर्वी ऐकले होते कि Xiaomi आपल्या नवीन आगामी एंड्राइड वन स्मार्टफोन्स मध्ये स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजचे चिपसेट आणू शकते. आता पुन्हा एकदा नवीन माहिती समोर आली आहे ज्यातून असेच काहीसे समोर आले आहे, विशेष म्हणजे यावेळीची माहिती मागील बातमीला जोड देत आहे.

जर एका ट्विट बद्दल बोलायाचे झाले तर त्यात या फोन्सना कोडनेम देण्यात आले आहेत. जे असे आहेत, Bamboo Sprout आणि Casmos Sprout . याचा अर्थ असा कि यावेळी पण Xiaomi आपल्या Mi A सीरीज मध्ये तेच करणार आहे, जे आधी केले आहे.

 

 

सध्या या चिपसेट बद्दल संपूर्ण माहिती उपलब्द नाही कि हे कोणते चिपसेट असतील पण इतके नक्की कि हे 700 सीरीजचे चिपसेट असतील. एक अंदाज असा लावला जात आहे कि या फोन्स मध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगॉन 730 प्रोसेसर मिळेल, किंवा असे पण होऊ शकते कि हे फोन्स स्नॅपड्रॅगॉन 712 सह लॉन्च केले जातील. कदाचित Mi A3 Lite मोबाईल फोन स्नॅपड्रॅगॉन 710 सह येऊ शकतो.

असे पण समोर येत आहे कि Xiaomi अजून एका स्मार्टफोन वर पण काम करत आहे, जो स्नॅपड्रॅगॉन 7XX प्रोसेसर सह येणार आहे. ज्याचे कोडनेम Pyxis आहे. अजून याबाबत जास्त माहिती समोर आली नाही. पण असे बोलले जात आहे कि येत्या काळात याची माहिती समोर येईल.

रुमर्स पाहता Xiaomi Mi A3 मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एका चांगल्या मिड-रेंज मोबाईल फोनची सर्व वैशिष्ट्ये मिळणार आहेत, विशेष म्हणजे या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक पॉवरफुल प्रोसेसर मिळणार आहे, सोबत यात एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर पण मिळेल. याचा अर्थ असा कि Xiaomi Mi A3 असा पहिला मोबाईल फोन असेल जो या सीरीज मध्ये OLED पॅनल सह लॉन्च केला जाईल.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo