Xiaomi 8 ऑगस्ट ला आपला नवीन स्मार्टफोन Mi A2 भारतात लॉन्च करेल. Xiaomi Mi A2 सर्वात आधी स्पेन मध्ये लॉन्च करण्यात आला होता. लॉन्च च्या आधी अशी माहिती समोर आली आहे की हा डिवाइस भारतात अमेजॉन एक्सक्लूसिव म्हणून लॉन्च केला जाईल. अमेजॉन इंडिया वर Xiaomi Mi A2 साठी एक खास पेज बनवण्यात आले आहे, ज्यावर नोटीफाई मी चे बटन पण देण्यात आले आहे. अमेजॉन व्यतिरिक्त Xiaomi Mi A2 कंपनी च्या वेबसाइट mi.comवर पण सेल साठी उपलब्ध होईल.
हा डिवाइस कंपनी कडून 5.99-इंचाच्या 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या 2.5D कर्व गोरिला ग्लास प्रोटेक्शन असलेल्या स्क्रीन सह लॉन्च करण्यात आला आहे. फोन स्टॉक एंड्राइड 8.1 Oreo वर चालतो, तसेच यात Octa-core स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर आहे. फोन ची स्टोरेज तुम्ही 128GB पर्यंत वाढवू शकता.
फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप आहे, हा एक 12+20 मेगापिक्सल च्या सेंसर चा कॉम्बो आहे. त्याचबरोबर फोन मध्ये एक 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पण देण्यात आला आहे. फोन मध्ये एक 3,000mAh क्षमता असलेली बॅटरी QuickCharge 3.0 सह देण्यात आली आहे.
Xiaomi Mi A2 डिवाइस बद्दल बोलायचे तर याचा 4GB रॅम आणि 32GB स्टोरेज मॉडेल स्पेन मध्ये EUR 249 म्हणजे जवळपास Rs 20,100 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, तसेच 4GB रॅम आणि 64GB वेरिएंट EUR 279 म्हणजे Rs 22,500 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, त्याचबरोबर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट EUR 349 म्हणजे जवळपास Rs 28,100 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आता तरी असे वाटते आहे की हा स्मार्टफोन भारतात पण याच किंमतीच्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो. भारतात येताना या डिवाइस च्या किंमतीत थोडे फार बदल होण्याची शक्यता आहे.