Xiaomi Mi A2 ला Android 9.0 Pie चा स्टेबल अपडेट मिळण्यास झाली सुरवात
शाओमी च्या Mi A2 ला मिळालेल्या या अपडेट मुळे यूजर्सना अनेक नवीन फीचर्स मिळत आहेत. जरी कंपनी कडूंन या स्टेबल अपडेट बद्दल कोणत्याही प्रकारची घोषणा केली गेली नसली तरी काही यूजर्स नुसार त्यांना हा अपडेट मिळाला आहे.
चीनी मोबाईल निर्माता कंपनी शाओमी च्या Mi A2 स्मार्टफोनला गूगलचा लेटेस्ट एंड्रॉयड 9.0 पाईचा स्टेबल अपडेट मिळणे सुरु झाले आहे. एंड्रॉयड पाई सोबत कंपनी Mi A2 ला नोव्हेंबर 2018 एंड्रॉयड सिक्योरिटी पॅच पण देत आहे. Xiaomi Mi A सीरीजच्या स्मार्टफोन्स प्रमाणे Mi A2 पण स्टॉक एंड्रॉयड वर चालतो. Xiaomi Mi A2 ला मिळालेल्या नवीन अपडेट मुळे यूजर्स अनेक नवीन फीचर्स वापरू शकतील. या नवीन फीचर्स मध्ये जेस्चर नेविगेशन, अडाप्टिव बॅटरी, ब्राइटनेस आणि मोबाईल फोन संबंधित अनेक इंप्रूवमेंट पण सामील आहेत. अनेक यूजर्स नुसार त्यांना हा अपडेट मिळाला आहे पण या स्टेबल अपडेटची माहिती कंपनी कडून अधिकृतरीत्या देण्यात आलेली नाही.
असे यूजर्स ज्यांना अजून त्यांच्याकडे हा स्टेबल अपडेट आला आहे कि नाही हे माहित नाही त्यांनी खाली दिलेल्या स्टेप्स फोल्लो करा
सेटिंग्स वर जा
सॉफ्टवेयर अपडेट मध्ये जा
पेज वर अपडेट ची लेटेस्ट माहिती मिळावा
जीएसएम ऐरिना च्या रिपोर्ट्सनुसार Xiaomi Mi A2 च्या भारतीय यूजरला सर्वात आधी हा स्टेबल अपडेट मिळाल्याची बातमी आली होती. साइट वर एक स्क्रीनशॉट पण शेअर करण्यात आला आहे. तुम्हाला सांगू इच्छितो कि नवीन अपडेटची साइज 1GB पेक्षा जास्त सांगण्यात येत आहे. Android 9 Pie स्टेबल अपडेट इंस्टॉल करण्याआधी फोन आठवणीने wi-fi शी कनेक्ट करा. जर अपडेट इंस्टॉल करायचा असेल तर त्याआधी यूजर्सचा फोन 80 परसेंट चार्ज असणे आवश्यक आहे.
Xiaomi Mi A2 चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi Mi A2 स्मार्टफोन मध्ये 5.99 इंचाचा डिस्प्ले 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह देण्यात आला आहे. स्क्रीन 2.5डी कर्व्ड गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन सह येते. ड्यूल-सिम सोबत डिवाइस एंड्रॉयड 8.1 ओरियो वर चालेल. यात ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्स साठी एड्रेनो 512 जीपीयू इंटीग्रेटेड आहे. फोन मध्ये 6 GB पर्यंत रॅम सोबत इनबिल्ट स्टोरेज 128 जीबी पर्यंत असेल. यासोबत डिवाइस मध्ये एआई बॅकग्राउंड बोकेह आणि एआई स्मार्ट ब्यूटी 4.0 सारखे फीचर देण्यात आले आहेत. हॅन्डसेट मध्ये फेस अनलॉक फीचर पण आहे आणि फिंगरप्रिंट सेंसर पण मागील बाजूस आहे.
बॅटरी बद्दल बोलायचे तर यूजर्स साठी यात 3000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हि क्विक चार्ज 4.0 सपोर्ट सह येते. कनेक्टिविटी फीचर मध्ये 4जी एलटीई, ड्यूल-बँड वाई-फाई ए/बी/जी/एन/एसी, वाई-फाई डायरेक्ट, मीराकास्ट, ब्लूटूथ 5.0, आईआर एमीटर आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सामील आहेत. लक्षात असू दे कि यावेळी फोन मध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक नाही. फोटोग्राफी साठी कॅमेरा सेट-अप आर्टफिशियल इंटेलिजेंस सह येतो, यात 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच यात एफ/1.75 अपर्चर, फिक्स्ड फोकल लेंस आणि सॉफ्ट एलईडी फ्लॅश आहे. मागील बाजूस एआई डुअल कॅमेरा सेटअप आहे. प्राइमरी सेंसर 12 मेगापिक्सलचा आहे आणि सेकेंडरी सेंसर 20 मेगापिक्सलचा आहे. रियर कॅमेरा सेटअप फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि डुअल-टोन एलईडी फ्लॅश सह येतो.
फोनच्या मागील आणि पुढील कॅमेरा एआई सीन रिकग्निशन सह येतात जेणेकरून फोटो चांगल्या कलर सह येतात. याव्यतिरिक्त फ्रंट आणि रियर कॅमेरा मध्ये एआई पोर्ट्रेट मोड आहे. त्याचबरोबर एआई बॅकग्राउंड बोकेह आणि एआई स्मार्ट ब्यूटी 4.0 सारखे फीचर या फोन मध्ये देण्यात आले आहेत. या डिवाइस मध्ये फेस अनलॉक फीचर पण आहे आणि फिंगरप्रिंट सेंसर बॅक पॅनल वर आहे.