Xiaomi Mi A2 आधी पासून एक वाट बघायला लावणारा डिवाइस आहे, पण शाओमी ने दावा केला आहे की हा अजून अस्तित्वात आला नाही. तसेच, चीन मध्ये एप्रिल मध्ये घोषित Mi 6X मोठया प्रमाणात मागच्या वर्षीच्या शाओमी च्या लोकप्रिय एंड्रॉइड वन डिवाइस चा उत्तराधिकारी म्हणून समोर येण्याची अफवा आहे. काही दिवसांपूर्वी, PimpiTronic नामक एका यूट्यूब चॅनल द्वारा पोस्ट केलेल्या एका वीडियो ने दावा केला आहे की त्यांनी एक अनअनाउन्स्ड फोन हातात घेतला आहे. त्यांनी फोन च्या काही प्रमुख स्पेसिफिकेशन्स वर चर्चा केल्याचा एक वीडियो पण बनवाला आहे. पण, वीडियो मध्ये सूचना देण्यात आली होती की रिपोर्ट पूर्ण पणे खरा समजू नये.
Mysmartprice च्या रिपोर्ट नुसार Mi 6X च Mi A2 च्या रुपता सादर केला जाईल. फ्रंट कॅमेरा आणि पीस किंवा इतर सेंसर Mi 6X सारखे दिसत आहेत. वीडियो ने हा पण खुलासा केला आहे की फोन एंड्रॉइड वन प्रमाणित असेल आणि आउट ऑफ द बॉक्स एंड्रॉइड 8.1 ओरेओ वर चालेल, हा वीडियो फोन चा बॅक पॅनल दाखवत नाही, पण जर हा खरच Mi 6X असल्यास याच्या मागच्या बाजूला वर्टिकल डुअल कॅमेरा असेल.
वीडियो ने फोन च्या काही प्रमुख स्पेक्स चा खुलासा केला आहे. फोन स्नॅपड्रॅगन 660 एसओसी द्वारा संचालित केला जाईल तसेच बॅक वर 12 मेगापिक्सेल सोनी आईएमएक्स 486 प्राइमरी सेंसर आणि 20 मेगापिक्सेल सोनी आईएमएक्स 376 सेकेंडरी सेंसर असेल.
याआधी अफवांनी दावा केला होता कि Mi A2 मध्ये फुल एचडी + रिजॉल्यूशन चा 5.99-इंचाचा आईपीएस एलसीडी पॅनल आणि त्यावर 2.5 डी सुरक्षात्मक कर्व ग्लास असेल. बॅक कॅमेरा मध्ये 30 एफपीएस वर 4 के वीडियो शूट करण्याची क्षमता असेल. फ्रंट ला एक 2.0 मेगापिक्सेल सोनी आईएमएक्स 376 सेंसर असेल ज्यात 2.0um पिक्सेल आकार, सॉफ्ट एलईडी फ्लॅश आणि एआई पोट्रेट असेल. हे सर्व फ्रंट कॅमेरा फीचर्स यावर्षी भारतात लॉन्च झालेल्या काही रेड्मी डिवाइस मध्ये आधी पासून आहेत.
Mi A2 एक रीब्रांडेड Mi 6X असू शकतो, त्यामुळे फोन मध्ये 3,010 एमएएच ची बॅटरी असेल जी क्वालकॉम क्विक चार्ज 3.0 सह येईल. एक रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचर असेल. पण, Mi 6X वादग्रस्त 3.5 मिमी हेडफोन जॅक पासून दूर आहे. हे पण समजले नाही की Mi A2 मध्ये यूएसबी-टाइप सी संचालित ऑडियो जॅक असेल किंवा इतर फोन्स प्रमाणे पोर्ट असेल ते.