Xiaomi Mi A1 स्मार्टफोन ला मिळाला एंड्राइड Oreo 8.1 चा अपडेट सोबत आहे July चा एंड्राइड सिक्यूरिटी पॅच

Updated on 17-Jul-2018
HIGHLIGHTS

Xiaomi Mi A1 ला एंड्राइड Oreo 8.1 चा अपडेट मिळाला आहे, हा अपडेट काही काळासाठी पॉज करण्यात आला होता, कारण असे बोलले जात होते की हा अपडेट यूजर्स च्या फोन मधून त्यांचे SMS रिमूव करत आहे.

Xiaomi Mi A1 gets Android 8.1 Oreo Support with July Security Patch: भरपुर वेळाने का होईना पण Xiaomi ने आपल्या Xiaomi Mi A1 स्मार्टफोन जुलै च्या सिक्यूरिटी पॅच सह एंड्राइड Oreo 8.1 चा अपडेट दिला आहे. तसेच या अपडेट मध्ये आता SMS बग पण फिक्स करण्यात आला आहे. हा अपडेट काही काळासाठी पॉज करण्यात आला होता, कारण असे बोलले जात होते की हा अपडेट यूजर्स च्या फोन मधून त्यांचे SMS रिमूव करत आहे. 

पण आता समोर येत आहे की कंपनी ने हा बग पण फिक्स केला आहे आणि त्याच मुळे या अपडेट सोबत कंपनी ने जुलै चा सिक्यूरिटी पॅच पण दिला आहे. MIUI फोरम वर एका यूजर कडून Xiaomi Mi A1 ला मिळालेल्या या अपडेट च्या काही स्क्रीनशॉट वरून याची माहिती मिळाली आहे. या अपडेट चा बिल्ड नंबर OPM1.171019.026.V9.6.4.0.ODHMIFE आहे. 

विशेष म्हणजे Xiaomi या जेनेरेशन च्या आपल्या नवीन स्मार्टफोन म्हणजे Xiaomi Mi A2 पण लॉन्च करण्याची तयारी करत आहे. त्याचबरोबर अजून एक डिवाइस Xiaomi Mi A2 Lite बद्दल पण माहिती समोर आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोंस ओ एंड्राइड वन प्लॅटफार्म वर लॉन्च करण्यात येतील. 

Xiaomi Mi A1 स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस कंपनी ने क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर सह लॉन्च केला आहे. यात 4GB चा रॅम पण आहे. सोबतच यात 64GB ची इंटरनल स्टोरेज आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. यात 5.5-इंचाचा डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 2.5D कर्व्ड ग्लास सह येतो. यात मागच्या बाजूला एक फिंगर प्रिंट सेंसर पण आहे. 

Xiaomi Mi A1 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेरा 12MP चे आहेत. एक टेलीफ़ोटो लेंस आहे आणि दुसरी वाइड-एंगल लेंस आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :