Xiaomi Mi 8 चा हँड्स-ऑन विडियो झाला लीक, ड्यूल कॅमेरा सह या फीचर्स कडे करत आहे ईशारा
हा विडियो लीक झाल्याने आपल्याला समजले आहे की डिवाइस मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप व्यतिरिक्त इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असणार आहे.
Xiaomi या महिन्याच्या 31 तारखेला आपला एक इवेंट चीन मध्ये आयोजित करणार आहे, या इवेंट बद्दल असे समोर येत आहे की कंपनी आपल्या या इवेंट मध्ये आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त आपला Mi 8 डिवाइस लॉन्च करू शकते आणि असे झाले तर कंपनी कडून हा त्यांचा एनिवर्सरी एडिशन असेल. याबद्दल अधिकृतपणे काही समोर आले नाही. पण या डिवाइस ची किंमत आणि याचे स्पेक्स लीक झाले आहेत. त्याचबरोबर आता या डिवाइस चा एक हँड्स-आॅन विडियो समोर आला आहे. जो स्मार्टफोन च्या डिजाईन ची माहिती देतो.
हा रिपोर्ट स्लॅशलीक च्या माध्यमातून समोर आला आहे. या विडियो चा अवधि फक्त 9 सेकंड्स चा आहे. यात हा डिवाइस फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूने बघता येतो. हा फोन या पीढी च्या बाकी फोन्स सारखाच वाटतो. याव्यतिरिक्त या फोन च्या बॅक वर एक ड्यूल कॅमेरा सेटअप दिसत आहे. जो वर्टीकल पोजीशन मध्ये फोन मध्ये सामिल करण्यात आला आहे. हा काही प्रमाणात iPhone X सारखा दिसतो. तसेच फोन मध्ये फ्रंट ला एक फुल-स्क्रीन डिस्प्ले दिसत आहे. फोन मध्ये एक नॉच पण तुम्हाला दिसत आहे. पण या विडियो मध्ये स्मार्टफोन मध्ये कोणताही फिंगरप्रिंट सेंसर दिसत नाही. पण काही रुमर्स नुसार या डिवाइस मध्ये एक इन-डिस्प्ले-फिंगरप्रिंट सेंसर असेल.
वेइबो वरून मिळालेली माहिती पाहता या डिवाइस मध्ये एक 6.01-इंचाचा नॉच वाला डिस्प्ले असणार आहे, सोबतच या फोन मध्ये एक इन-फिंगरप्रिंट सेंसर असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन 3D फेशियल रिकग्निशन सह लॉन्च केला जाऊ शकतो, असेच काहीसे आपण iPhone X डिवाइस मध्ये पण पाहिले आहे. हा डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च केला जाऊ शकतो, हा एक ओक्टा-कोर प्रोसेसर असेल. याव्यतिरिक्त यात 6GB चा रॅम तसेच 64GB ची इंटरनल स्टोरेज असू शकते, फोन 8GB रॅम आणि 128GB च्या इंटरनल स्टोरेज सह पण लॉन्च केला जाऊ शकतो.
कॅमेरा बघून माहिती समोर आली आहे, त्यानुसार या डिवाइस मध्ये तुम्हाला एक ड्यूल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. पण लीक वरून AI कॅमेरा यात असणार आहे या बद्दल पण माहिती समोर आली आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला यात एक एडवांस कॅमेरा मिळणार आहे.
याच्या किंमती बद्दल बोलायचे झाले तर लीक नुसार डिवाइस च्या 6GB रॅम वेरिएंट ची किंमत RMB 2,799 असेल, याचा अर्थ असा की हा जवळपास Rs 30,000 च्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच याच्या 8GB रॅम मॉडेल ची किंमत RMB 3,199 म्हणजे जवळपास Rs 34,200 च्या आसपास असू शकते.