Xiaomi Mi 8 च्या फ्रंट पॅनल सह नवीन डिवाइस चा पण झाला खुलासा

Updated on 22-May-2018
HIGHLIGHTS

या नवीन फोटो वरून याचा पण खुलासा होतो की डिवाइस मध्ये एक मोठा नॉच आहे ज्यात 3D मोड्यूल आहे आणि जो या फोन मध्ये 3D फेशियल स्कॅनिंग साठी आहे.

Xiaomi ने स्पष्ट केले आहे की या महिन्याच्या अखेरीस कंपनी इवेंट आयोजित करणार आहे. अंदाज लावला जात आहे की हा इवेंट 31 मे ला आयोजित केला जाईल. अशा केली जात आहे की इवेंट मध्ये कंपनी Mi 8th एनिवर्सरी एडिशन फोन सादर करेल जो Xiaomi Mi 8 मोनिकर सह सादर केला जाईल. रुमर्स yet आहेत की हा पहीला असा स्मार्टफोन असेल जो 3D फेशियल रिकोग्निशन फीचर सह येईल. काही दिवसांपूर्वी कथित Mi 8 च्या फ्रंट पॅनल चे दोन शॉट्स ऑनलाइन दिसले आहेत. या नवीन फोटो वरून याचा पण खुलासा होतो की डिवाइस मध्ये एक मोठा नॉच आहे ज्यात 3D मोड्यूल आहे आणि जो या फोन मध्ये 3D फेशियल स्कॅनिंग साठी आहे. 
फोटो मध्ये दिसलेला मोठा नॉच मागच्या आठवड्यात समोर आलेल्या Mi 8 के 3D फेशियल स्कॅनिंग मोड्यूल सारखा दिसत आहे. Mi 8 च्या नॉच मध्ये मल्टीपल सेंसर्स असू शकतात ज्यात फ्रंट कॅमेरा, इयरपीस, प्रोक्सिमिटी सेंसर, एम्बिएंट सेंसर, इन्फ्रारेड लेंस, फ्लड इल्लुमिनेटर आणि डॉट प्रोजेक्टर सामील आहेत. Mi 8 मधील मोठया नॉच चे हे एक कारण असू शकते. 
बाजारात ज्या एंड्राइड फोन्स मध्ये फेस अनलॉक फीचर आहे ते 2D फेशियल स्कॅनिंग फीचर सह येतात. ते ब्राइट लाइट मध्ये चेहरा ओळखून फोन अनलॉक करू शकतात पण कमी प्रकाशात तेवढे कार्यक्षम नाहीत. त्यामुळे 2D फेशियल स्कॅनिंग iPhone X मधील 3D फेशियल स्कॅनिंग इतकी प्रभावी नाही. 
फोटो मध्ये नॉच डिस्प्ले असलेले दोन फोन्स चे फ्रंट पॅनल दिसत आहेत. हे कंपनी चे आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन्स असू शकतात. डावीकडील फ्रंट पॅनल चे फोटो या पोस्ट च्या पहिल्या फोटो शी मेळ खात आहे ज्यामुळे असे वाटते की हा Xiaomi Mi 8 शी संबंधित आहे. दुसरा डिवाइस Mi 8 पेक्षा छोटा डिवाइस असू शकतो. या डिवाइस ची साइज कथित Mi 8 पेक्षा छोटी आहे. असा तर्क लावला जात आहे की हा छोटा डिवाइस Mi 7 असू शकतो. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :