Xiaomi Mi 8 चा 8GB रॅम वेरिएंट 6GB वेरिएंट च्या किंमतीत चीन मध्ये झाला लॉन्च
Mi 8 मे मध्ये 6GB रॅम आणि अजून काही स्टोरेज वेरिएन्ट्स सह लॉन्च करण्यात आला होता.
Xiaomi ने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi 8 चा एक नवीन वेरिएंट चीन मध्ये लॉन्च केला आहे. Xiaomi Mi 8 चा नवीन वेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह येतो. Mi 8 मे मध्ये 6GB रॅम आणि अजून काही स्टोरेज वेरिएन्ट्स सह लॉन्च करण्यात आला होता. Xiaomi Mi 8 च्या 8GB+128GB वेरिएंट ची किंमत 6GB+256GB वेरिएंट एवढीच आहे. हा चीन मध्ये 3299 Yuan (Rs 33,000 रूपये) मध्ये उपलब्ध आहे.
Xiaomi Mi 8 स्मार्टफोन मध्ये एक 6.21-इंचाचा 1080×2248 पिक्सल वाला 18:9 आस्पेक्ट रेश्यो असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात सॅमसंग ने बनवलेला सुपर AMOLED डिस्प्ले आहे. तसेच या डिस्प्ले मध्ये नॉच डिजाईन पण आहे.
कॅमेरा बद्दल बोलायचे तर हा डिवाइस एका 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा सह लॉन्च करण्यात आला आहे. हा नॉच मध्ये आहे त्याचबरोबर तिथे प्रोक्सिमिटी सेंसर, इयरपिस, इन्फ्रारेड लाइटिंग आणि इन्फ्रारेड लेंस पण आहे. फोन मध्ये कंपनी ने एक एडवांस इन्फ्रारेड फेस अनलॉक फीचर दिला आहे. असे बोलले जात आहे की हा अॅप्पल च्या iPhone X मधील फेस ID पेक्षा पण जास्त सिक्योर आहे.
हा डिवाइस क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच हा डिवाइस या प्रोसेसर सोबत AnTuTu वर बघितल्यास याला सर्वात जास्त म्हणजे 301,472 चा स्कोर मिळाला आहे. यापेक्षा जास्त स्कोर या प्रोसेसर सोबत इतर कोणत्याही स्मार्टफोनला मिळालेला नाही. या डिवाइस च्या रियर कॅमेरा बद्दल बोलायचे तर या डिवाइस मध्ये 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा देण्यात आले आहेत. फोन एंड्राइड 8.1 Oreo वर चालतो.