आशा आहे की हा एक फुल HD+ रेजोल्यूशन डिस्प्ले असेल.
आता एका नव्या लीक मध्ये खुलासा करण्यात आला आहे की, Xiaomi Mi 7 मध्ये 6.01-इंचाचा OLED डिस्प्ले असू शकतो. ही माहिती वेइबो वर शेयर करण्यात आली आहे. यात सॅमसंग चा डिस्प्ले असेल. काही महिन्यांपूर्वी अशी बातमी समोर आली होती जिच्यात दावा करण्यात आला होता कि या फोन मध्ये OLED पॅनलच असेल, जो सॅमसंग सप्लाई करेल. हा एक ऑलवेज-ऑन डिस्प्ले असू शकतो. आशा आहे की हा एक फुल HD+ रेजोल्यूशन डिस्प्ले असेल. यासोबत दुसर्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की Mi 7 मध्ये iPhone X सारख डिस्प्ले असू शकतो. तसेच फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आणि 6GB आणि 8GB रॅम ऑप्शन मध्ये उपलब्ध होऊ शकतो. यात 3170mAh ची बॅटरी असू शकते.