Xiaomi Mi 7 चे डिटेल्स झाले लीक, Mi Mix 2S प्रमाणे येईल यात असेल वायरलेस चार्जिंग

Xiaomi Mi 7 चे डिटेल्स झाले लीक, Mi Mix 2S प्रमाणे येईल यात असेल वायरलेस चार्जिंग
HIGHLIGHTS

Xiaomi Mi 7 ला Mi Mix 2S सह 2018 च्या त्या लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आले ज्यात ते एंड्राइड मॉडल्स आहेत जे वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करतील.

Xiaomi 2018 च्या पहिल्या सहामाहीत स्नॅपड्रॅगन 845 असलेले दोन फ्लॅगशिप स्मार्टफोंस सादर करू शकते. गिजमोचाइना च्या रिपोर्ट नुसार यातीलएक डिवाइस Mi Mix 2S 27 मार्चला लॉन्च होऊ शकतो, तसेच अंदाज लावला जात आहे की कंपनी आपला Mi 7 फ्लॅगशिप डिवाइस पण लॉन्च करू शकते पण याच्या लॉन्च च्या तरखेबाबात घोषणा करण्यात आलेली नाही. नव्या रिपोर्ट नुसार Mi 7 स्मार्टफोन वायरलेस चार्जिंग फीचर सह येऊ शकतो. 

ESB डॉक्यूमेंट मध्ये लीक झालेल्या डिटेल नुसार Mi 7 वायरलेस चार्जिंग सपोर्ट करेल. याआधी आलेल्या रुमर मध्ये समोर आले आहे की Mi 7 स्मार्टफोन 7.5W वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करेल जो कि Apple iPhone 8, iPhone 8 Plus आणि iPhone X स्मार्टफोंस मध्ये पण उपलब्ध आहे. 
Xiaomi Mi 7 ला Mi Mix 2S सह 2018 च्या त्या लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आले ज्यात ते एंड्राइड मॉडल्स आहेत जे वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करतील. Mix 2s बद्दल आलेल्या एका टीजर मध्ये कंपनी ने खुलासा केला आहे की हा डिवाइस वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करेल. 

 
अपेक्षा केली जात आहे की Mi 7 मध्ये 6 इंचाचा OLED डिस्प्ले असेल जो सॅमसंग सप्लाई करेल. या डिवाइस मध्ये स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट असेल आणि 6GB/8GB रॅम वेरिएंट मध्ये उपलब्ध होईल. Xiaomi या फोन मध्ये सिनेप्टिक्स ने सप्लाई केलेल्या ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट टेक्निक पण वापरेल. 

कंपनी च्या या फ्लॅगशिप डिवाइस मध्ये वर्टिकल डुअल कॅमेरा सेटअप असेल आणि काही दिवसांपूर्वी आलेल्या रुमर वर विश्वास ठेवला तर Mi 7 जून मध्ये सादर केला जाईल. पण ही फक्त एक अफवा आहे. कंपनी कधी या फोन ला लॉन्च करेल ते बघावे लागेल. 
फीचर्ड इमेज काल्पनिक आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo