शाओमी Mi5 आणि शाओमी रेडमी नोट 3 आज दुपारी २ वाजल्यापासून ओपन सेलमध्ये मिळणार आहे. आज ह्या दोन्ही स्मार्टफोन्सना खरेदी करण्यासाठी कोणत्याही रजिस्ट्रेशनची गरज नाही.
कंपनीने भारतात शाओमी Mi 5 ला 3GB रॅम आणि 32GB च्या अंतर्गत स्टोरेजच्या व्हर्जनमध्ये सादर केले आहे. ह्याची किंमत २४,९९९ रुपये आहे. शाओमी Mi 5 मध्ये 5.15 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. ही डिस्प्ले कर्व्ह्ड 3D सेरामिक ग्लाससह येते. ह्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता 428ppi आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्र्रॅगन 820 प्रोसेसर, एड्रेनो 530 GPU आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे.
त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. कॅमेरा फेज डिटेक्शन ऑटोफोकससह येतो. ह्या फोनने 4K व्हिडियो रेकॉर्डिंगसुद्धा केली जाऊ शकते. ह्या फोनमध्ये 4 अल्ट्रपिक्सेल फ्रंट कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्या फोनचा आकार 144.5×69.2×7.25mm आणि वजन 129 ग्रॅम आहे. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन क्विक चार्जिंग फीचरने सुसज्ज आहे. फोनमध्ये टाइप-C USB पोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय 802.11 A/B/G/AC, ब्लूटुथ 4.2, ग्लोनास आणि NFC आहे.
चीनमध्ये ह्या स्मार्टफोनला 32GB आणि 64GB अशा प्रकारात लाँच केले गेले होते. त्याचबरोबर ह्यात 3D ग्लास बॅकसह लाँच केले गेले होते. ह्याचा एक 128GB चा प्रकारसुद्धा लाँच केला गेला होता, जो एक 3D सेरामिक बॉडीने सुसज्ज होता.
शाओमी रेडमी नोट ३ स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांवाषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण IPS डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल. हा स्मार्टफोन पुर्णपणे मेटल यूनीबॉडीने बनला आहे. ह्याचे वजन केवळ १६४ ग्रॅम आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसर दिले गेले आहे. असे पहिल्यांदाच घडत आहे की, भारतामध्ये ह्या प्रोसेसरमध्ये एखादा स्मार्टफोन लाँच झाला आहे. हा एक हेक्सा कोर प्रोसेसर आहे, ज्यात २ कोर्टेक्स-A72 कोर्स आणि 4 कोर्टेक्स-A53 कोर्सने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये एड्रेनो ५१० GPU सुद्धा दिला गेला आहे. स्मार्टफोन दोन स्टोरेज प्रकारामध्ये म्हणजेच 6GB/32GB मध्ये मिळेल, ज्यात क्रमश: 2GB आणि 3GB चे रॅम दिले गेल आहे. हा स्मार्टफोन सिल्वर, डार्क ग्रे आणि गोल्ड रंगात उपलब्ध होईल.
येथे क्लिक करा- शाओमी रेडमी नोट 3 रिव्ह्यू
त्याचबरोबर ह्यात १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा ड्यूल LED फ्लॅशसह दिला गेला आहे. जो आपल्याला फेज डिटेक्शन ऑटोफोकससह मिळत आहे. त्याशिवाय फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे, जो f/2.0 अॅपर्चरने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये 4050mAh क्षमतेची नॉन-रिमूव्हेबल बॅटरीसुद्धा असू शकते, जो फास्ट चार्जिंग सपोर्टसह आपल्याला मिळत आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला गेला आहे.
हेदेखील वाचा – कूलपॅड नोट 3 स्मार्टफोनची किंमत झाली कमी
हेदेखील वाचा – सोनी SRS-XB3 वायरलेस स्पीकर लाँच, किंमत १२,९९० रुपये