शाओमी MI 5, रेडमी 3X च्या किंमतीत झाली घट

शाओमी MI 5, रेडमी 3X  च्या किंमतीत झाली घट
HIGHLIGHTS

आता हा स्मार्टफोन CNY 1,799 (जवळपास १८,१०० रुपये) च्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

शाओमी Mi5 स्मार्टफोन बाजारात लाँच होऊन जवळपास ५ महिने होऊन गेले. आता ह्या स्मार्टफोनच्या किंमतीत अधिकृतरित्या घट झाली आहे. आता कंपनीने ह्या फोनच्या किंमतीत CNY 200 (जवळपास २,००० रुपये) घट केली आहे. आता हा स्मार्टफोन CNY 1,799 (जवळपास१८,१०० रुपये) च्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

शाओमी Mi 5 स्मार्टफोनच्या 32GB व्हर्जनची किंमत चीनमध्ये CNY 1,799 (जवळपास १८,१०० रुपये) आहे, तर 64GB व्हर्जनची किंमत CNY 2,099 (जवळपास २१,००० रुपये) आहे. शाओमी MI 5 प्रो मध्ये 4GB रॅम आणि 128GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे.

 

हेदेखील वाचा – ५००० रुपयाच्या किंमतीत येणारे उत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन्स…

 

तर भारतात शाओमी Mi 5 च्या 32GB व्हर्जनची किंमत २४,९९९ रुपये आहे. त्यामुळे केवळ चीनमध्ये ह्या स्मार्टफोनच्या किंमतीत घट झाली आहे. मात्र लवकरच भारतात सुद्धा ह्या स्मार्टफोनची किंमत कमी केली जाईल.

 

त्याचबरोबर रेडमी 3X स्मार्टफोनच्या किंमतीतही घट केली आहे. हा स्मार्टफोन जूनमध्ये लाँच केला गेला होता. लाँचवेळी ह्या स्मार्टफोनची किंमत CNY 899 (जवळपास ९,००० रुपये) होती. मात्र आता ह्या किंमतीत CNY 100 (जवळपास १००० रुपये) ची घट केली आहे.

हेदेखील वाचा – BSNL ने आपल्या लँडलाइन यूजर्ससाठी केली मोफत अनलिमिटेड कॉलिंगची घोषणा
हेदेखील वाचा – सॅमसंगने भारतात लाँच केला गॅलेक्सी नोट 7 स्मार्टफोन, किंमत ५९,९९० रुपये

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo