मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने अलीकडेच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन शाओमी Mi 5 सादर केला होता. लाँच दरम्यान अशी माहिती दिली गेली होती की, कंपनी Mi 5 भारतात एप्रिल २०१६ मध्ये लाँच करेल. तथापि, त्यावेळी ह्या फोनच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती दिली गेली नव्हती. मात्र आता ह्या फोनशी संबंधित एक नवीन माहिती समोर आली आहे, ज्यात ह्या फोनच्या किंमतीविषयी माहिती दिली गेली आहे.
इकॉनॉमिक्स टाइम्स दिल्या गेलेल्या माहितीत शाओमीचे प्रेसिडेंट लीन बिनने अशी माहिती दिली आहे की, भारतात शाओमी Mi 5 स्मार्टफोनची किंमत साधारण २०,००० ते २७,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते.
शाओमी Mi 5 च्य वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर असेल, त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची QHD डिस्प्ले 1440×2560 पिक्सेल रिझोल्युशन असू शकते. हा गोरिलाल ग्लास 4 ने संरक्षित आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये आपल्याला 4GB ची रॅम मिळू शकते. ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 16GB आणि 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 16 मेगापिक्सेलचा रियर आणि 6 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असू शकतो. त्याचबरोबर ह्यात 3030mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा असू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1.1 सह शाओमीच्या स्वत: च्या MiUI ओएसवर चालेल.
हेसुद्धा वाचा – अॅप ओव्हरव्ह्यू: Leo Privacy (Advertorial)
हेसुद्धा वाचा – पुन्हा एकदा अपडेट झाले व्हॉट्सअॅप, मिळणार हे नवीन फीचर