शाओमी Mi5 आता अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, स्नॅपडिल आणि टाटा क्लिकवर सुद्धा उपलब्ध

Updated on 13-Jun-2016
HIGHLIGHTS

ह्या आधी हा स्मार्टफोन केवळ mi.com वरुनच खरेदी केला जात होता.

फ्लिपकार्टवर खरेदी करा शाओमी Mi 5 २४,९९९ रुपये

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी शाओमीने काही दिवसांपूर्वी बाजारात आपला फ्लॅगशिप डिवाइस शाओमी Mi 5 लाँच केला होता. आता हा फोन अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, स्नॅपडिल आणि टाटा क्लिकवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ह्याला कंपनीने ऑनलाइन स्टोर mi.com वरुनही खरेदी करु शकता. ह्याआधी ह्या स्मार्टफोनला केवळ mi.com वरुनच खरेदी केले जात होते. कंपनीने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

शाओमी Mi 5 च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.15 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. ही डिस्प्ले कर्व्ह्ड 3D सेरामिक ग्लाससह येते. ह्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता 428ppi आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्र्रॅगन 820 प्रोसेसर, एड्रेनो 530 GPU आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे.

हेदेखील पाहा – 3GB रॅमसह येणारे १० बजेट स्मार्टफोन्स

त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हा कॅमेरा फेज डिटेक्शन ऑटोफोकससह येतो. ह्या फोनने 4K व्हिडियो रेकॉर्डिंगसुद्धा केली जाऊ शकते. ह्या फोनमध्ये 4 अल्ट्रपिक्सेल फ्रंट कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्या फोनचा आकार 144.5×69.2×7.25mm आणि वजन 129 ग्रॅम आहे. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन क्विक चार्जिंग फीचरने सुसज्ज आहे. फोनमध्ये टाइप-C USB पोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय 802.11 A/B/G/AC, ब्लूटुथ 4.2, ग्लोनास आणि NFC आहे.
 

हेदेखील वाचा – लेनोवोच्या प्रोजेक्ट टँगोवर आधारित असलेला PHAB 2 प्रो स्मार्टफोन लाँच

हेदेखील वाचा – Envent LiveFree 570, 530 वॉटरप्रूफ ब्लूटुथ स्पीकर्स लाँच, किंमत अनुक्रमे ३९९९ रुपये, २४९९ रुपये

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :